अनिल कपूर यांच्या फिटनेसमागील नेमकं रहस्य काय?, लेकीचा मोठा खुलासा समोर

On: February 22, 2024 4:37 PM
Anil Kapoor fitness secret revealed
---Advertisement---

Anil Kapoor | अभिनेते अनिल कपूर सध्या 67 वर्षाचे आहेत. मात्र फिटनेसच्या बाबतीत ते भल्याभल्या अभिनेत्यांना मागे टाकतात. आजही ते अगदी फिट अँड फाइन आहेत. त्यांच्या (Anil Kapoor) फिटनेसमागील नेमकं रहस्य आहे तरी काय, याबाबत सर्वांनाच जाणून घ्यायची उत्सुकता आहे.

आता याबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. अनिल कपूर यांची लाडकी लेक तथा अभिनेत्री सोनम कपूरने यामागील रहस्य सांगितलं आहे. डॉक्टर शिव के सरीन यांच्या ‘ओन युअर बॉडी : डॉक्टर्स लाईफ सेविंग टिप्स’ या पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान सोनम कपूर बोलत होती.

या कार्यक्रमातच सोनमने बोनी कपूर, संजय कपूर आणि अनिल कपूर या तीनही भावांच्या जीवनशैलीबद्दल खुलासा केला. या वयातही अनिल कपूर एवढे कसे सुंदर आणि फिट दिसतात, याबाबत तिने खुलासा केला आहे. अनिल कपूर चिरतरुण दिसण्यासाठी काय मेहनत घेतात याचं रहस्य आता उलगडलं आहे.

अनिल कपूर यांच्या फिटनेसमागील रहस्य

अभिनेत्री सोनम कपूर म्हणाली की, “माझे वडील (Anil Kapoor) हे फारच शिस्तप्रिय आहेत. ते धूम्रपान करत नाहीत, मद्यपान करत नाहीत, त्यांना कसलंच व्यसन नाही. त्यांना कोणतंही व्यसन न जडण्याचं श्रेय हे माझ्या आईला जातं. अगदी खरं सांगायचं झालं तर माझ्या आईनेच सर्वप्रथम मुंबईत पर्सनल ट्रेनिंगसाठी जीमची सुरुवात केली, त्यामुळे ती किती फिटनेस फ्रिक आहे हे मला वेगळं सांगायची गरज नाही.”, असं सोनम म्हणाली आहे.

पुढे आपल्या आईचं कौतुक करत ती म्हणाली की, “माझ्या वडिलांना कधी कधी व्यायामाचा कंटाळा येतो पण आई त्यावेळी त्यांना चांगलं प्रोत्साहन देते. ती एक आदर्श भारतीय पत्नी आहे.” बोनी कपूर यांच्याबद्दलही सोनमने खुलासा केला. बोनी कपूर यांना आयुष्य मोकळं जगायला आवडतं. ते ड्रिंकही करतात. त्यांना खायला खूप आवडतं अन् कधीतरी मद्यपानदेखील करायला आवडतं. माझे काका संजय कपूर देखील तसेच आहेत, असं सोनम म्हणाली.

दरम्यान, अनिल कपूर (Anil Kapoor) नुकतेच हृतिक रोशन व दीपिका पदूकोण यांच्या ‘फायटर’ या चित्रपटात झळकले. या चित्रपटातील त्यांच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं. त्यापुर्वी त्यांनी ‘अॅनिमल’ या चित्रपटात रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका साकारली होती.

News Title – Anil Kapoor fitness secret revealed

महत्त्वाच्या बातम्या –

बॉलिवूडमधील आणखी एका कपलमध्ये मतभेद?, घटस्फोट घेणार?

अजय महाराज बारस्कर यांच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर!

अजिंक्य रहाणेच्या घरी आली आलिशान कार; किंमत जाणून बसेल धक्का

लोकसभा निवडणूक: निवडणूक आयोगाने शुभमन गिलवर सोपवली मोठी जबाबदारी!

मंदिरावरही लागणार ‘कर’, ‘हिंदूविरोधी’ म्हणत काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली!

Join WhatsApp Group

Join Now