Anil Kapoor | ..अन् प्रसिद्ध अभिनेता ढसाढसाच रडला; त्या कार्यक्रमात असं नेमकं काय घडलं?

On: January 25, 2024 6:37 PM
Anil Kapoor broke down in tears during promotion
---Advertisement---

Anil Kapoor | ‘अॅनिमल’ चित्रपटात रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका साकारत अभिनेते अनिल कपूर यांनी पुन्हा एकदा आपला जलवा दाखवून दिला. अभिनयाच्या बाबतीत ते भल्याभल्यांना मागे टाकतात. आता नुकताच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात अनिल कपूर (Anil Kapoor) यांना अश्रु अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि हृतिक रोशन (Hrithik Roshan) यांच्या बहुचर्चित ‘फायटर’ (Fighter Trailer) या सिनेमात अनिल कपूरदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान असं काही घडलं की, अनिल कपूर ढसाढसाच रडले.

अनिल कपूर यांना अश्रू अनावर

अभिनेता हृतिक रोशन याने चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एक विधान केले, ते ऐकूनच अनिल कपूर (Anil Kapoor) यांना अश्रु अनावर झाले. “एक सहाय्यक म्हणून काम करताना अभिनेते अनिल कपूर सरांना पाहून त्यांच्याकडून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. माझ्यासाठी अनिल सर कायमच एक प्रेरणास्थान राहिले आहेत. आज जगासमोर जो हृतिक आहे त्यात अनिल कपूर यांचा मोठा वाटा आहे. गेली चार दशकं मेहनत घेऊन आजही कित्येक नव्या गोष्टी करण्याची ताकद अनिल सरांमध्ये आहे.”, असे विधान हृतिक रोशन याने केले.

हृतिक रोशनचे हे शब्द ऐकून अनिल कपूर यांना लगेच अश्रू अनावर झाले. यावेळी अनिल कपूर भावूक झाल्याचेही दिसून आले. हृतिकने वडील राकेश रोशन यांच्या अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक म्हणून काम केले आहे आणि अनिल कपूर यांनी ‘खेल’ आणि ‘कारोबार’ या चित्रपटात त्यांच्यासोबत काम केले आहे. याच काळात हृतिकला अनिल कपूर यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. याबाबतच त्याने आपल्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला.

अनिल कपूर दिसणार नव्या भुमिकेत

15 जानेवारी रोजी ‘फायटर’ या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला. मात्र यात मुख्य भूमिकेत असलेले ऋतिक दीपिका नव्हे तर अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्या एंट्रीचीच अधिक चर्चा झाली. अनिल कपूर (Anil Kapoor) आणि हृतिक यांच्या डायलॉगमुळे चित्रपट नक्कीच हीट ठरेल, असे म्हटले जात आहे. ट्रेलरमधूनच प्रत्येकाची देशभक्ती जागी होईल, असे सीन दाखवण्यात आले आहेत.

या ट्रेलरमध्ये भारत पाकिस्तान युद्धाची एक झलक दिसून आली. मिसाईल युद्ध ते डायलॉग यामुळे ट्रेलर चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. त्यामुळे चाहते आतापासूनच चित्रपटाची बुकिंग करतील, असे दिसून येत आहे. हा बहुचर्चित चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

News Title- Anil Kapoor broke down in tears during promotion

महत्त्वाच्या बातम्या –

Alia Bhatt च्या साडीवर ‘रामायण’, रणबीर कपूरच्या शालची किंमत लाखोच्या घरात

लोकसभा निवडणुकीनंतर Rahul Gandhi यांना अटक होणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

Kangana Ranaut हुबेहुब इंदिरा गांधींसारखी दिसते; ‘Emergency’ मधील झलक, रिलीज डेट जाहीर

संदीप राऊत हाजीर हो…! Sanjay Raut यांच्या भावाला ईडीची नोटीस; प्रकरण काय?

ACB ची मोठी कारवाई! सरकारी अधिकाऱ्याकडे सापडली 100 कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता

Join WhatsApp Group

Join Now