Radhika Merchant | गेल्या वर्षी उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) विवाहबंधनात अडकला. (Radhika Merchant)
12 जुलै 2024 रोजी अनंत अंबानीने राधिका मर्चंटशी (Radhika Merchant) लग्न केले. एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे (Encore Healthcare Pvt Ltd) सीईओ (CEO) वीरेन मर्चंट (Viren Merchant) आणि उद्योजिका शैला मर्चंट (Shaila Merchant) यांची कन्या राधिका मर्चंट आता अंबानी कुटुंबाची धाकटी सून आहे.
लग्नानंतर राधिका आणि अनंत अनेक ठिकाणी एकत्र दिसतात. नुकतेच, अनंत अंबानी पत्नी राधिका मर्चंटसह एका खास मित्राच्या संगीत सोहळ्याला (Sangeet Ceremony) उपस्थित होते. यावेळी अनंत आणि राधिका थिरकताना दिसले. त्यांचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत.
राधिकाचा ‘अनारकली डिस्को चली’ गाण्यावर डान्स:
व्हायरल व्हिडिओमध्ये राधिका मर्चंट मैत्रिणींबरोबर ‘हाउसफुल्ल 2’ (Housefull 2) चित्रपटातील ‘अनारकली डिस्को चली’ (Anarkali Disco Chali) गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. यावेळी राधिकाच्या अंदाजाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या संगीत सोहळ्यासाठी तिने शिमरी सिल्व्हर रंगाचा (Shimmery Silver Color) लेहंगा (Lehenga) परिधान केला होता.
अनंत अंबानीचा मित्रांसोबत डान्स:
दुसऱ्या व्हिडिओत अनंत अंबानी आपल्या मित्रांबरोबर डान्स करताना दिसत आहे. ‘शूट आउट एट लोखंडवाला’ (Shootout at Lokhandwala) चित्रपटातील ‘उनके नशे में’ (Unke Nashe Mein) या गाण्यावर अनंत मित्रांबरोबर थिरकताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता वीर पहारियासुद्धा (Veer Pahariya) दिसत आहे. (Radhika Merchant)
व्हिडिओ व्हायरल:
राधिका आणि अनंत अंबानीचा हा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत आहे. तसेच अनेक प्रतिक्रिया देखील उमटत आहेत.
View this post on Instagram
Title : Anant Ambani Radhika Merchant Dance at Friends Sangeet Ceremony






