‘मी फिरते मळ्यात….’; देवेंद्र फडणवीसांसाठी अमृता फडणवीसांनी घेतला उखाना

On: October 22, 2023 1:02 PM
mruta fadnavis
---Advertisement---

नागपुर | राज्यात सध्या नवरात्रची धूम पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी दांडिया (Dandiya) आणि रास गरबा (Ras Garba) खेळण्यासाठी तरुण-तरुणी गर्दी करत असतात. गरब्याच्या कार्यक्रमांना राजकीय मंडळी सुद्धा हजेरी लावतात. दरम्यान एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी उपस्थिती लावली होती.

रास गरबा कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) हे उपस्थित होते. नागपूर येथे दांडिया तसेच गरब्याच्या कार्यक्रमाला अमृता फडणवीसांनी हजेरी लावली. यावेळी अमृता फडणवीस यांनी उखाणा देखील घेतला.

अमृता फडणवीस यांनी घेतला उखाणा

अमृता फडणवीस यांनी खास देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी उखाणा घेतला. त्या म्हणाल्या की, “मी फिरते मळ्यात, नजर माझी तळ्यात… देवेंद्रजी सारखे रत्न पडले माझ्या गळ्यात…” असा उखाणा अमृता फडणवीसांनी घेतला आहे. त्यांच्या या उखाण्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

अमृता फडणवीस म्हणाल्या, “नवरात्रीनिमित्त लोकांमध्ये फार उत्साह आहे. माझ्याकडून सर्वांना नवरात्री आणि विजयादशमीच्या खूप शुभेच्छा. मी स्वत:च्या आनंदासाठी गरबा कार्यक्रमात सहभागी झाले आहे. आजच्या दिवशी मी आईचरणी हेच साकडं घालते की, आपला महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम राहो, सर्व क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर येवो. आपल्या नागपूरात असुविधा न येवो, अशी प्रार्थना करते.”

थोडक्यात बातम्या-

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now