“हे राम, मामींना ऑस्कर देऊन टाका”, अमृता फडणवीसांना नेटकऱ्यांनी पुन्हा केलं ट्रोल

On: April 18, 2024 7:07 PM
Amruta Fadanvis
---Advertisement---

Amruta Fadanvis | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) या नेहमी कोणत्यान् कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्यांना गाण्यांचं, संगिताचं अधिक वेड आहे. ते आपल्या सोशल मीडियावर रोज अपडेट करतात, तसेच स्वतः गायलेल्या आपल्या आवाजातील गाण्याच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्या अनेकदा त्यांच्या गाण्यावरून ट्रोल देखील झाल्यात आहेत.

अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी ‘हे राम’ गाणं सध्या सोशल मीडियावर शेअर केलं आहे. राम नवमीनिमित्त हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं. या गाण्यामुळे अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरल्या आहेत. त्या सोशल मीडियावर असल्याने अनेक अपडेट शेअर करत असतात. त्यांनी राम नवमीनिमित्त ‘हे राम’ गाण्याचे काही भाग सोशल मीडियावर शेअर केलेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)


हे राम गाणं अमृता फडणवीस यांनी गायलं असून त्यांच्यासोबत प्रसिद्ध गायक कैलाश खेर देखील आहेत. राम नवमीनिमित्त गाण्याचे काही भाग सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी राम नवमीच्या शुभेच्छा दिल्यात. गाण्यात अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांच्या आवाजावरून नेटकऱ्यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांना ट्रोल केलं आहे.

अमृता फडणवीस ट्रोल

अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर आपल्या आवाजातील गाणं शेअर केलं. गाणं ऐकताच नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलंय. हे राम वाचव आमचे कान, मामी नको ना, मामींनाऑस्कर देण्यात यावा, अशा अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Comments On Amruta Fadnavis Video

“कशाला वाट लावता मामी देवाच्या नावाची”

एका नेटकऱ्याने लिहिलं की आताशी झोपेतून उठले, आता परत झोपते, कशाला वाट लावता मामी देवाच्या नावाची, मामी अतिशय भयानक लहान लहान लेकरं फॉलो करतात तुम्हाला, घाबरतील हो, असे एक ना अनेक कमेंट्स आहेत.

अमृता फडणवीस यांच्या गाण्याला आतापर्यंत युट्यूबरवर 30 हजारांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर 100 हून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. सोशल मीडियावर अमृता यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे.

News Title – Amruta Fadanvis Get Trolled On Her Song

महत्त्वाच्या बातम्या

पंकजा मुंडेंची मनोज जरांगेंवर पहिल्यांदाच टीका, थेट म्हणाल्या..

‘दोन-चार महिन्यात शिंदे..’, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

मिधेंना माझं जाहीर आव्हान, माझ्यासोबत… आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

16 वर्षाच्या भाच्यावर आला आत्याचा जीव, प्रकरण कोर्टात जाताच आला आत्याला हादरवून टाकणारा निकाल

अखेर ठरलं… शिंदे गटाचं एक पाऊल मागे, नारायण राणेंची उमेदवारी जाहीर

Join WhatsApp Group

Join Now