अमृता फडणवीसांच्या ‘आज मूड बना लेया’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ!

On: January 6, 2023 7:04 PM
---Advertisement---

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांचं (Amruta Fadnavis) नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. मूड बनालेया असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं अवघ्या काही तासांत मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे.

अमृता फडणवीस या बँकर असून, त्या गायिकाही आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक गाणी गायली असून, त्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे.

या गाण्यांनी प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन केलं आहे. आता त्यांचं नवं गाणं प्रदर्शित झाले आहे. अमृता यांनी या म्युझिक व्हिडिओमध्ये डान्सही केला आहे. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं दिसतंय.

दरम्यान, अमृता यांनी गुरुवारी या गाण्याचा टीझर प्रदर्शित केला होता. या टीझरलाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. अनोखी फॅशन सेन्स, गोड आवाज आणि राजकीय शेरेबाजीमुळे त्या नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात.

अमृता फडणवीसांच्या आतापर्यंतच्या गाण्यांप्रमाणे हे नवीन गाणंसुद्धा हिट ठरणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now