Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांनी केली मोठी घोषणा, म्हणाल्या ‘लवकरच…’

On: January 21, 2024 11:46 AM
Amuta Fadnavis
---Advertisement---

पुणे | देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या गायिका आहेत. अमृता यांच्या प्रत्येक गाण्याला नेटकरी प्रचंड प्रतिसाद देताना दिसतात. अशात अमृता फडणवीस यांच्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज आहे. अमृता फडणवीसांचं नवं गाणं लवकरच येणार आहे.

अमृता फडणवीस यांनी केली मोठी घोषणा

अमृता फडणवीस  (Amruta Fadnavis) यांनी पुण्यात बोलताना मोठी घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्रीरामांबाबत एक गाणं लिहिलं आहे. ते लवकरच सर्वांच्या भेटीला येईल, असं अमृता फडणवीसांनी सांगितलं आहे.

Amruta Fadnavis यांचं नवं गाणं येणार

पुण्यात आज ‘वॉक फॉर नेशन’चं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे नमो वॉकथॉनचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला अमृता फडणवीस देखील उपस्थित होत्या.

प्रसिद्ध संगितकार अजय-अतुल यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. या गाण्यात मी देखील गायलं आहे. आज पहिल्यांदाच मी हे सांगत आहे. हे गाणं लवकरच रिलीज होईल, असं अमृता फडणवीस म्हणाल्यात.

उद्या अवघ्या देशाचं लक्ष अयोध्या नगरीकडे असेल. अयोध्येतील राम मंदिराचं उद्या उद्घाटन होणार आहे. यावरही अमृता यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी मोदींचं कौतुक केलं. तसेच मोदींमुळे राम भक्तांचं स्वप्न पूर्ण होत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान होणार आहेत. ही सुखाची बाब आहे. भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे हे स्वप्न पूर्ण होणार आहे. योग्य निर्णय घेतल्यामुळे राम मंदिर झालं आहे. सगळ्या राम भक्तांसाठी हा आनंदाचा सोहळा आहे, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. तसेच यावेळी बोलताना त्यांनी जय श्री रामच्या घोषणाही दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोदींना तोंड दाखवलं नाही; लैंगिक छळाचे आरोप अन् Brijbhushan Singh यांचा खुलासा

“Pakistan चे माजी PM इम्रान खान यांनाही त्यांच्या देशात मोदींसारखा नेता हवाय”

तिसऱ्या लग्नानंतर Shoaib Malik चा मैदानात पराक्रम; ठरला आशियातील पहिला खेळाडू

Ram Mandir | ‘ही’ मोठी चूक करत असाल तर सावधान! सरकारचा गंभीर इशारा

IPL 2024 चे भविष्य भारत सरकारच्या हाती! पण का? BCCI ने दिली माहिती

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now