“एखाद्याने वाटीभर शेण खाल्लं असेल तर तू पाटीभर…”

On: September 20, 2023 12:29 PM
---Advertisement---

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणजे लबाड लांडग्याची लेक, अशी घणाघाती टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेते प्रचंड आक्रमक झाले. यानंतर आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पडळकरांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी मी तुम्हाला नम्रतापूर्वक विनंती करतो, तुमचा तो पाळलेला कुxx गोप्या हा त्याच्या लायकीपेक्षा जास्त भुंकतोय. आज तो त्याच्या लायकीबाहेर भुकलेला आहे. ज्याची ख्याती मंगळसूत्र चोर अशी आहे, जो समाजाचा होऊ शकला नाही, जो आपल्या जन्म देणाऱ्या आईचा होऊ शकला नाही. सख्ख्या भावाचा होऊ शकला नाही, देवाचाही होऊ शकला नाही, अशा वाया गेलेल्या गोप्याला तुम्ही वेळीच आवर घालावी वेसण घालावी, असं म्हणत मिटकरींनी पडळकरांना सुनावलं.

अजित पवारांवर टीका करण्याची गोपीचंद पडळकरांची ही पहिली वेळ नाही. याआधीही त्यांनी अजित पवार, शरद पवारांवर टीका केलीये. मात्र आता अजित पवार भाजपसोबत सत्तेत असून आहेत, असं असतानाही पडळकरांनी अजित पवारांवर घणाघाती टीका केली. यानंतर अजित पवार समर्थकांकडून मित्र पक्षांकडून अजित पवारांचा अपमान करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया समोर आली. यावर प्रतिक्रिया देत भाजप आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट केलं.

मित्र पक्षांनी दादांवर टीका करणं म्हणजे दादांचा अपमान.. मग महाविकास आगाडी मध्ये दादा असताना संजय राऊत ऊटसुट दादांवर टीका आणि दादांच्या विरोधात अग्रलेख लिहायचे ते कसं चालायचं? त्यांना कोणाचा आशीर्वाद होता मग? पडळकर आणि संजय राजाराम राऊतला वेगळा न्याय का? संजय राऊत ला मुक्त सहमती होती का?, असा सवाल करत नितेश राणेंनी अप्रत्यक्षपणे पडळकरांच्या टीकेला पाठिंबा दिला. यानंतर नितेश राणेंच्या प्रश्नाला उत्तर देत मिटकरींनी राणेंवर देखील निशाणा साधलाय.

कोकणातील एका आमदाराच्या लॉजिक बद्दल प्रश्न विचारावा वाटतो की बाबारे एखाद्याने वाटीभर शेण खाल्लं असेल तर तु पाटीभर खाणार का? अजितदादा केवळ राष्ट्रवादी पक्षाचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा मानबिंदू आहेत! #गोप्याच्या सडकछाप भाषेचा केविलवाणा बचाव करणाऱ्यासाठी, असं प्रत्युत्तर मिटकरींनी राणेंना दिलं.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now