“लिहून घ्या, चोरलेला बाण त्यांच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही”

On: February 18, 2023 10:29 AM
---Advertisement---

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही कार्यकर्त्यांना आवाहन केलंय. मिटकरी यांनी ट्विटच्या माध्यमातून लढाईसाठी आम्ही सज्ज आहोत, असं म्हटलंय. मविआतील अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंसोबत आम्ही ताकतीने उभे राहू, असं आश्वासन दिलंय.

अमोल मिटकरी यांनी आरंभ है प्रचंड, बोले मस्तकोंके झुंड, आज जंग की घडी की तुम गुहार दो… या गाण्याच्या ओळी ट्विट केल्या आहेत.

निवडणूक आयोगाचा निर्णय आहे… याला मी ऐतिहासिक निर्णय म्हणत नाही. निवडणूक आयोग मॅनेज झाला आहे. धनुष्यबाण हा बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे यांच्याबरोबर होता. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आजही शिवसैनिक आज विचलित झाले नाहीत.  आयोगाच्या या निर्णयाने तीळमात्रही फरक पडणार नाही, असं मिटकरी म्हणालेत.

महाविकास आघाडी कायमस्वरुपी उद्धवजींच्या सोबत होती. आजही आहे आणि भविष्यातही राहणार, असं मिटकरी म्हणालेत.

आजच्या निकालानंतर मविआचा प्रत्येक घटकपक्ष आणखी ताकतीने उद्धव ठाकरेंसोबत उभा राहिल. लिहून घ्या धनुष्यबाण जरी त्यांनी चोरून घेतला असेल तो बाण त्यांच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now