Maharashtra Politics | आढळरावांची अजितदादांना साथ; अमोल कोल्हे म्हणाले…

On: December 26, 2023 1:11 PM
Maharashtra Politics
---Advertisement---

Maharashtra Politics | आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उभा करू आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचा पराभव करू, असं ओपन चॅलेंज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. अजित पवारांच्या वक्तव्यावर शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Maharashtra Politics | आढळरावांची अजितदादांना साथ

अजितदादांनी केलेलं वक्तव्य योग्यच आहे. विद्यमान खासदार अमोल कोल्हे पाच वर्षात मतदारसंघात फिरकलेच नाहीत, असं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे.

आता निवडणूक आल्यावर आक्रोश यात्रा सुचतेय. पाच वर्षात जनता आक्रोश करत असताना यांना दिसले नाही. राहिला विषय अजितदादांचा तर दादांनी एखादी गोष्ट मनावर घेतली की ती ते करून दाखवतात हे आपणा सर्वांना माहितीये, अशा शब्दात आढळराव पाटील यांनी अजितदादांना साथ दिली आहे.

Maharashtra Politics | अमोल कोल्हे काय म्हणाले?

आढळरावांनी केलेल्या टीकेला अमोल कोल्हेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्हाला एक म्हण माहीतच असेल, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी आढळरावांना जोरदार टोला लगावला आहे.

आदरणीय दादा मोठे नेते आहेत, आता ते जी टीका करत आहेत, मी आहे तिथेच आहे, मात्र जी काही टीका होत आहे, यासंदर्भात त्यांना कान धरण्याचा अधिकार होता, तेव्हाच त्यांनी धरला असता, तर सोपं झालं असतं, असं अमोल कोल्हे म्हणाले.

मी सर्वसामान्य कुटुंबातील आहे. त्यांनी माझ्यासमोर आव्हान उभं केलं तर मी माझा गौरव मानतो. आमचे दादा नेते होते, त्यांच्याविषयी प्रतिक्रिया देणं माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला शोभणारं नाही, त्यासंदर्भात मी त्यांच्याशी बोलेन, असं अमोल कोल्हे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

Weather Update | पुन्हा पाऊस कोसळणार; हवामान विभागाचा मोठा इशारा

Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची अपडेट!

Prakash Ambedkar | उद्धव ठाकरेंबाबत प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट!

Aishwarya Rai च्या ‘या’ गोष्टीमुळे संपूर्ण बच्चन कुटुंब अडचणीत!

IND vs SA | दिग्गजांना जमलं नाही ते रोहित शर्मा करून दाखवणार?; भारताला इतिहास रचण्याची संधी

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now