भाजपने अमोल कविटकर यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी!

On: July 29, 2026 8:05 PM
Amol Kavitkar
---Advertisement---

Amol Kavitkar | भारतीय जनता पार्टी (Bharatiya Janata Party) महाराष्ट्र प्रदेश यांनी पक्ष संघटनेतील महत्त्वाच्या पदांपैकी एक असलेल्या ‘दौरा समन्वयक माध्यम विभाग’ या पदावर अमोल कविटकर (Amol Kavitkar) यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबाबतचे अधिकृत पत्र आज पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयातून जारी करण्यात आले असून, हा निर्णय तत्काळ प्रभावाने अमलात आला आहे. पक्षाचे दौरे, माध्यम समन्वय आणि संघटनात्मक उपक्रम अधिक परिणामकारक पद्धतीने राबविण्याच्या उद्देशाने ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

माध्यम समन्वयाची धुरा अमोल कविटकरांकडे :

पक्ष संघटनेचे कार्य अधिक गतिमान आणि प्रभावी करण्यासाठी राज्यभरातील दौऱ्यांचे नियोजन, माध्यमांशी समन्वय साधणे तसेच विविध संघटनात्मक कार्यक्रमांचे व्यवस्थापन सक्षमपणे पार पडावे, यासाठी ही नियुक्ती करण्यात आल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या भूमिकेत अमोल कविटकर यांच्यावर राज्यभरातील माध्यम विभागाशी संबंधित महत्त्वाच्या जबाबदाऱ्या राहणार आहेत.

अमोल कविटकर यांनी यापूर्वीही पक्ष संघटना, जनसंपर्क आणि माध्यम क्षेत्रात सक्रियपणे काम केले आहे. २०२३ ते २०२६ या कालावधीत त्यांनी पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्याशिवाय इलेक्ट्रॉनिक माध्यम क्षेत्रात तब्बल १२ वर्षे बातमीदार ते ब्युरो चीफ या विविध पदांवर काम करत त्यांनी मोठा अनुभव मिळवला आहे. त्यांच्या या अनुभवाचा पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाला निश्चितच फायदा होईल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे.

Amol Kavitkar | अभिनंदनाचा वर्षाव, नव्या जबाबदारीबद्दल व्यक्त केल्या शुभेच्छा :

या नियुक्तीनंतर भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून अमोल कविटकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. नव्या जबाबदारीत त्यांनी प्रभावी कामगिरी करत पक्ष संघटना अधिक मजबूत करावी आणि माध्यम समन्वय अधिक सक्षम करावा, अशा शुभेच्छाही विविध स्तरांतून व्यक्त केल्या जात आहेत.

नियुक्तीनंतर अमोल कविटकर यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले की, “भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या ‘दौरा समन्वयक – माध्यम विभाग’ या महत्त्वाच्या जबाबदारीसाठी माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी पक्ष नेतृत्वाचा मनापासून ऋणी आहे. हा माझ्यासाठी सन्मान असला तरी त्याचवेळी मोठी जबाबदारीदेखील आहे. नेतृत्वाने व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी, पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी, माध्यम समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी आणि प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे व समर्पित भावनेने पार पाडण्यासाठी मी कटिबद्ध आहे. ही संधी दिल्याबद्दल पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेतृत्वाचे मनःपूर्वक आभार.”

News Title: Amol Kavitkar Gets BJP Role

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now