लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! जुलै महिन्याचे 1500 रुपये ‘या’ तारखेला जमा होणार

On: July 29, 2026 6:24 PM
Ladki Bahin Yojana
---Advertisement---

Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mukhyamantri Majhi Ladki Bahin) योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जुलै महिना संपत आला असतानाही अनेक लाभार्थींना या महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे पैसे नेमके कधी जमा होणार, याबाबत महिलांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून आता यासंदर्भातील नवीन माहिती समोर आली आहे.

जुलैच्या हप्त्याबाबत नवी माहिती :

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्त्वाची योजना असून, पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये आर्थिक सहाय्य जमा केले जाते. जून महिन्याचा लाभ जुलै महिन्याच्या 15 तारखेला लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. मात्र, यानंतर जुलै महिन्याचा हप्ता अद्याप वितरित झालेला नसल्याने अनेक महिला त्याची प्रतीक्षा करत आहेत.

यामुळे “जुलै महिन्याचे पैसे नेमके कधी मिळणार?” हा प्रश्न लाभार्थींमध्ये सातत्याने विचारला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेपर्यंत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

Ladki Bahin Yojana | अधिकृत घोषणेची प्रतीक्षा कायम :

सरकारकडून साधारणपणे प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात आर्थिक मदत जमा करण्याचे नियोजन केले जाते. त्याच पार्श्वभूमीवर यावेळी काही प्रशासकीय कारणांमुळे विलंब झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात असून ऑगस्टच्या मध्यापर्यंत जुलैचा हप्ता वितरित होऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे.

दरम्यान, जुलै महिन्याच्या हप्त्याच्या अचूक वितरण तारखेबाबत राज्य सरकारने अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन किंवा आदेश जारी केलेला नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांनी सोशल मीडियावरील अप्रमाणित माहितींवर विश्वास न ठेवता शासनाकडून प्रसिद्ध होणाऱ्या अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

News Title: Ladki Bahin Yojana July Installment Update

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now