Amitabh Bachchan यांनी अखेर सांगून टाकलं… म्हणाले, “हाच माझा खरा वारसदार!”

On: December 19, 2023 3:02 PM
amitabh bachchan
---Advertisement---

Amitabh Bachchan | बाॅलिवूडमधील फेमस कपल म्हणून चर्चेत असणारे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. अनेक तर्कवितर्क लावून त्यांचा घटस्फोट होणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी आराध्या बच्चन हिच्या कार्यक्रमावेळी संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्रित पहायला मिळालं होतं.

बच्चन कुटुंब एकत्र पहायला मिळाल्याने घटस्फोटाच्या चर्चांना तात्पुरता ब्रेक लागला आहे.  अमिताभ बच्चन यांच्यासह ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी आराध्याच्या शाळेतील कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. हे सगळं सुरु असताना सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांनी मोठा खुलासा केला आहे.

अमिताभ बच्चन यांनी काय खुलासा केला?

ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्यबद्दल चर्चा सुरु असताना अमिताभ बच्चन यांनी घराचा खरा वारसदार कोण? याबद्दल ट्विट केलं आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी जुहू येथील “प्रतीक्षा” बंगला लेक श्वेता बच्चनच्या नावावर केला आहे. अमिताभ बच्चन यांनी केलेलं एक ट्विट सध्या सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे. ट्विटमध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या वारसदाराची घोषणा केली आहे.

खरा वारसदार कोण?

अमिताभ बच्चन म्हणाले, ‘माझा वारसदार अभिषेक तूच आहेस… माझा गौरव… माझा आनंद…’, यावेळी त्यांनी त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या काही ओळी सुद्धा ट्विट केल्या आहेत. अमिताभ बच्चन यांची ही सोशल मीडिया पोस्ट जुनी असली तरी सोशल मीडियावर ती सध्या व्हायरल होत आहे. चाहत्यांनी देखील बिग बी यांच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

पुढे ते काय म्हणाले?

अमिताभ बच्चन यांनी 2022 मध्ये हे ट्विट केलं होतं. यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की, “मुलगा असल्यामुळे वारसदार होत नाही, वारसदार होण्याची तेवढी पात्रता लागते.”

अमिताभ बच्चन यांनी त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांच्या काही ओळी ट्विट केल्या होत्या. त्या पुढील प्रमाणे होत्या- ‘मेरे बेटे, बेटे होने से मेरा उत्तराधिकारी नही होंगे : जो मेरा उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे’ असं ट्विट त्यांनी केलं होतं.

News Title : amitabh bachchan tells the real heir

थोडक्यात बातम्या-

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now