सून ऐश्वर्या रायसाठी अमिताभ बच्चन यांनी उचललं मोठं पाऊल!

On: February 22, 2024 4:48 PM
Amitabh Bachchan post
---Advertisement---

Amitabh Bachchan | गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत आहेत. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ऐश्वर्या बद्दल वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर प्रचंड टिका होत आहे. सोशल मिडियावर राहुल गांधी यांच्यासह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन यांच्यावरही निशाणा साधला जात आहे.

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी आपल्या सुनेवर टिका होत असताना काहीच भाष्य न केल्याने नेटकऱ्यांना ते चांगलंच खटकलं आहे. त्यामुळे नेटकरी बच्चन कुटंबाला टार्गेट करत आहे. अशातच आता अमिताभ बच्चन यांनी केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. त्यांनी राहुला गांधी यांना प्रत्युत्तर दिल्याचे नेटकरी म्हणत आहेत.

अमिताभ बच्चन यांचं ट्वीट

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) ट्विट करत म्हटलं की, ‘व्यायामासाठी वेळ… शारीरिक गतिशीलता… मनाची लवचिकता.. बाकी सर्व प्रतीक्षा करू शकतात…’ तसंच बिग-बी यांनी त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून देखील मोठं वक्तव्य केलं आहे. ‘अनेक दिवसांनंतर कार्य यात्रा, पण याच दरम्यान NGO मध्ये जाऊ शकलो नाही म्हणून काही तरी मागे राहिल्यासारखं वाटत आहे.’

‘जीवन चालत राहतं आणि त्यामुळे जीवन जगण्यची इच्छा कमी होत नाही. पंडित आणि बुद्धिमान व्यक्ती ज्ञान देत राहातात. मी प्रयत्न करत आहे. फक्त तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे.’ असं देखील अमिताभ बच्चन म्हणाले आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये कुठेच राहुल गांधी यांचं नाव घेतलं नाहीये. मात्र, ऐश्वर्याची बाजू घेण्यासाठीच बिग-बी यांनी ट्वीट केल्याचं चाहते म्हणत आहेत.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते?

बिहारमधून ‘भारत जोडो न्याय यात्रा’ उत्तर प्रदेशात दाखल झाल्यानंतर चंदौली जिल्ह्यातील एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधींनी सामाजिक न्यायाचा मुद्दा उपस्थित करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी राम मंदिर उद्घाटनावरून काही कलाकारांवरही निशाणा साधत टीका केली होती.

तुम्ही राम मंदिरातील उद्घाटन सोहळा पाहिला का? तिथे एकही ओबीसी चेहरा होता काय?, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय आणि नरेंद्र मोदी तिथे होते. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 73 टक्के लोक कार्यक्रमादरम्यान कुठेही दिसले नाहीत. कारण, भाजपला असं कधीही वाटलं नाही की, या लोकांनी देशाच्या महत्वाच्या प्रसंगी उपस्थित असावं.

नरेंद्र मोदी आज देशाला दोन भागांमध्ये वाटत आहेत. एकीकडे गरीबी तर दुसरीकडे काही लोक आलिशान विमानात प्रवास करत आहेत. गरिबांसाठी मजदूरी हाच मार्ग आज उरला आहे. मात्र, काही लोक देशातील रेल्वे, विमानतळ, जमीन काय-काय खरेदी करत आहेत. दोन भारत बनत आहे. एकीकडे ऐश्वर्या (Aishwarya Rai) नाचताना दिसेल तर दुसरीकडे अमिताभ बच्चन बल्ले बल्ले करत बाहेर येतील. शाहरुख खान, विराट कोहली हे सगळे दिसतील. पण, एक गरीब दिसणार नाही, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी सभेत केलं होतं. यानंतर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे.

News Title- Amitabh Bachchan post after Rahul Gandhi controversial statement about Aishwarya Rai

महत्त्वाच्या बातम्या –

‘या’ राशीच्या लोकांच्या वैवाहिक सुखात होईल वाढ !, पाहा आजचं राशीभविष्य

आंदोलक महिलेचे मनोज जरांगेंवर गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

विद्या बालन पाठोपाठ ‘या’ अभिनेत्रीची झाली ‘भूल भूलैया 3’ मध्ये एंट्री

सावधान! राज्यातील ‘या’ आठ जिल्ह्यांना बसणार अवकाळी पावसाचा फटका

‘धडा शिकवण्याची वेळ आलीये’; शरद पवारांनी केलं ‘या’ नेत्याला पाडण्याचं आवाहन

Join WhatsApp Group

Join Now