Sharmila Thackeray l विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाकडून उमेदवारी याद्या जाहीर केल्या जात आहेत. आतापर्यंत भाजप, शिवसेना शिंदे गट, अजित पवार गट आणि मनसेकडून उमेदवार जाहीर झाले आहेत. अशातच मनसेने 49 उमेदवारांची घोषणा केली आहे. तसेच मनसेच्या या पहिल्याच यादीत अमित ठाकरेंची देखील उमेदवारी जाहीर झाली आहे.
‘ओवाळणीत एक रुपया देखील नको, पण आमदारकी पाहिजे’ :
मनसेने उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर मनसेचे अनेक कार्यकर्ते अमित ठाकरे यांचे अभिनंदन करण्यासाठी शिवतीर्थ या निवासस्थानी जमले होते. याशिवाय मनसेकडून उमेदवारी मिळालेले नेते देखील शिवतीर्थवर आले होते. यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी अविनाश जाधव आणि राजू पाटील यांचे औक्षण केले. तर मिताली ठाकरे यांनी त्यांचे पती अमित ठाकरे यांचे उमेदवारी मिळाल्याने औक्षण केले.
यावेळी शर्मिला ठाकरे आणि मिताली ठाकरे यांनी मनसेच्या उमेदवारांचे औक्षण करताना म्हणाल्या की, ‘आम्हाला ओवाळणीत एक रुपया देखील नको, पण आमदारकी पाहिजे’. त्यानंतर अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे शर्मिला ठाकरे या भावूक झाल्या होत्या. यावेळी मुलाला उमेदवारी मिळाल्याने शर्मिला ठाकरे यांचे डोळे देखील पाणावले होते.
Sharmila Thackeray l अमित ठाकरेंसमोर मोठं आव्हान :
यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली आहे. त्यावेळी त्या म्हणाल्या की, ही सगळी माझी मुलं आहेत. या सगळ्यांना आमदार व्हायला पाहिजे असे शर्मिला ठाकरे यांनी म्हणाल्या आहेत. तसेच आता अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत. मात्र त्यांना आता शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ आमदार सदा सरवणकर यांचे आव्हान असणार आहे.
याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने माहीम विधानसभेत अमित ठाकरे यांच्याविरोधात महेश सावंत यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे आता माहीम विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
News Title : Sharmila Thackeray Statement Vidhansabha 2024
महत्वाच्या बातम्या-
’63 वर्षीय अभिनेत्यासोबत सेक्स सीन करताना त्यांनी मला…’; मल्लिका शेरावतकडून मोठा खुलासा
आता सुट्टी नाहीच; मनोज जरांगेंनी कोणाला केलं टार्गेट?
‘या’ मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांना भिडणार?
लवकरच Mini Fortuner कार बाजारात धुमाकूळ घालणार; जाणून घ्या किंमत?
दिवाळीला अयोध्येत घ्या रामलल्लाचं दर्शन; सर्वात स्वस्तातलं टूर पॅकेज मिळेल ‘इथे’






