Amir khan | बॉलीवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानच्या (Amir khan) मुलीचा नुकताच विवाहसोहळा पार पडला. आयरा खानने (ira khan) नोंदणी पद्धतीने नुपूर शिखरेशी (Nupur Shikhare)लग्न केलं. मात्र लग्नातील आमिरच्या जावयाचा हटके लूक सध्या चर्चेचा विषय बनला आहे. नुपूरने चमचमीत शेरवानी नाही तर, बनियन व शॉर्ट्स घालून आयराशी लग्नगाठ बांधली. त्याच्या या हटके लूकमुळे तो सध्या प्रचंड ट्रोल होत आहे.
Amir khan चा जावई सोशल मीडियावर ट्रोल
आमिर खानची लाडली लेक आयरा खानने धोती स्टाइल पँट व चोली परिधान केली होती. अगदी साध्या मेकअपने तीने आपला वेडिंग लूक केला होता. मात्र, नुपूरने जरा हटकेच म्हणून चक्क काळ्या रंगाची बनियान आणि शॉर्ट्सवर आपली वरात काढली.
त्याने फुलांनी सजवलेल्या कारमध्ये न जाता घरातून आठ किलोमीटर धावत लग्नस्थळी जाऊन अनोख्या पद्धतीने आयराशी लग्न केले. त्यानंतर त्याने ढोल वाजवत डान्सही केला. त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत. मात्र, या बनियान आणि शॉर्ट्समुळे नुपूर सध्या नेटकऱ्यांकडून प्रचंड ट्रोल होत आहे.
View this post on Instagram
Amir khan | “पैसे गोळा करून याला कपडे घेऊन द्या”
‘मला वाटतं की, मुलाचं डोकं फिरलंय पण ते दोघेही सारखेच आहेत वाटतं’, ‘यापेक्षा तर आमच्या गावात चांगली लग्न होतात.’ ‘…शेरवानीचे पैसे वाचले,’ ‘नवरदेव तर झोपूनच होता, तयार व्हायला वेळ नाही मिळाला, त्यामुळे स्वतःच्या लग्नात तो असा पोहोचलाय’, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
‘लग्नाच्या खुशीत कपडे घालायचे विसरून गेला’, ‘जुती ऐवजी कपडे चोरी कुणी केले’, ‘मुलगा आमीर असेल तर, मुलगी कच्छा बनियान वाल्यासोबतही लग्न करेल.’, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून उमटत आहेत. दरम्यान, आयरा आणि नुपूरच्या लग्नात आमिर खानची पहिली पत्नी किरण रावसह अनेक दिग्गज मान्यवरांचीही उपस्थिती होती.
Amir Khan son in law Nupur Shikhare trolled by netizens
महत्त्वाच्या बातम्या-
SSC, HSC EXAM : या कारणामुळे दहावी, बारावी बोर्ड परीक्षांमध्ये अडथळा येण्याची शक्यता
पाकिस्ताननं David Warner ला अखेरच्या सामन्यात दिलं अनोखं ‘गिफ्ट’ अन् झाली फजिती
work out in winter : हिवाळ्यात व्यायाम करताना ‘या’ गोष्टींची काळजी घेणे आवश्यक
Virat Kohli आणि शुबमन गिलची भर मैदानात ‘फुगडी’, पाहा Video
Two-Wheeler Launches In January 2024 | दमदार आणि आकर्षक फीचर्ससह या महिन्यात लाँच होणार या 4 बाईक्स






