अंबादास दानवेंचा मास्टरस्ट्रोक, थेट एकनाथ शिंदे यांचा ‘तो’ व्हिडीओ केला पोस्ट

On: April 25, 2024 10:15 PM
Ambadas Danve Tweet
---Advertisement---

Ambadas Danve Tweet | शिवसेना ठाकरे गटाचे नेते आंबादास दानवे यांची कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख आहे. परखड वक्तव्यासाठी ते नेहमी चर्चेत असतात. त्यांनी केलेल्या वक्तव्याची नेहमी चर्चा होते. मात्र आता त्यांनी आपल्या ( x ) अकाऊंटवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या त्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. अंबादास दानवे यांनी राज ठाकरे यांचा फॉर्म्युला वापरत एकनाथ शिंदे यांचा जूना व्हिडीओ बाहेर काढत पितळ उघडं पाडलं आहे. (Ambadas Danve Tweet)

दरम्यान, महाविकास आघाडीकडून माजी कृषिमंत्री शरद पवार हे माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सभेला संबोधित करत असताना त्यांनी मोदींवर हल्ला केला. त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींच्या भाषणाची जूनी ऑडिओ क्लिप बाहेर काढून ऐकवली होती. एकनाथ शिंदे हे शिवसेना फूटीआधी उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते तेव्हाचा हा व्हिडीओ अंबादास दानवे यांनी बाहेर काढला असून, ट्वीटच्या माध्यमातून जोरदार टीका केली. (Ambadas Danve Tweet)

व्हिडीओमध्ये एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?

अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांचा एक जूना व्हिडीओ बाहेर काढला आहे. तेव्हा शिवसेना आणि भाजप यांच्यात धुसफूस झालेली पाहायला मिळाली होती. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी एका सभेमध्ये बोलत असताना त्यांनी “मी त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. मी उघड्या डोळ्यांनी कार्यकर्त्यांवर अन्याय झालेला पाहू शकत नाही. मी सरकारमध्ये नाही बसू शकत. कारण मी हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहे,” असं एका सभेला संबोधित करत असताना त्यांनी वक्तव्य केलं होतं. भाषणाचा व्हिडीओ शिवसेना पक्ष फुटीपुर्वीचा होता.याच व्हिडीओवर अंबादास दानवे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. (Ambadas Danve Tweet)

अंबादास दानवेंचं ट्वीट

“शिवसैनिकांवरील भाजपचा अत्याचार उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हते म्हणे तेव्हा हे खोटारडे! यांच्या पाच उमेदवारांच्या नावावर फूली मारणाऱ्या भाजपच्या कारभारातही यांना आज हिमालयाची उंची दिसायला लागली आहे, यातच सगळं आलं! किती वेगाने रंग बदलतात हे!”, असं ट्वीट (Ambadas Danve Tweet) अंबादास दानवे यांनी केलंय.

महत्त्वाच्या बातम्या

गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर झालेल्या गोळीबाराबाबत धक्कादायक माहिती समोर!

“शेवटच्या दोन-तीन दिवसांमध्ये…”; सुनंदा पवार यांचं खळबळजनक वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीचं नेमकं कारण काय?; शरद पवार स्पष्टच बोलले

अनंत गीते यांना रायगड लोकसभा मतदारसंघातून प्रचंड विरोध; मतदारांनी बॅनरबाजी करत केला रोष व्यक्त

“पंकजा मुंडेंना पाडण्यासाठी धनंजय मुंडेंचा डाव?”

Join WhatsApp Group

Join Now