कारसारखी स्कूटर पण लाॅक करता येणार! Honda Activa H-Smart चे भन्नाट फिचर्स

On: January 28, 2023 1:12 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | होंडा मोटारसायकल अ‌ॅन्ड स्कूटर (Honda Motorcycles and Scooters) इंडियानं नुकतीच Honda Activa H-Smart भारतात लाॅन्च केली आहे. होंडा अ‌ॅक्टिवा ही देशातील सर्वात मोठ्या प्रमाणात विकली जाणारी स्कूटर आहे. नुकतीच लाॅन्च झालेल्या या Honda Activa H-Smart मधील फिचर्स (features) तुम्हाला थक्क करणारे आहेत.

Honda Activa H-Smart ची एक्स शोरुम किंमत 80,537 इतकी आहे. 109.51 cc इंजिन (engine) देण्यात आलं आहे. यातील सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यांना आवडणारं एक जबरदस्त फिचर या गाडीमध्ये आहे. आता तुम्हाला तुमच्या कारप्रमाणे ही Honda Activa H-Smart लाॅक करता येणार आहे.

या Honda Smart Key मध्ये एक Immobilizer सिस्टीम देखील आहे. ज्यामुळं दुसऱ्या कोणत्याही नोंदणी किंवा डुप्लीकेट किल्लीनं स्कूटर अनलाॅक (Unlock) होऊ शकत नाही. त्यामुळं स्कूटर चोरीला जाण्याचा प्रश्नच मिटला. यामध्ये 5 इन 1 लाॅक सिस्टिमदेखील असणार आहे.

अपघातातून वाचण्यासाठी स्कूटरचे चाक व्यवस्थित असणं गरजेचं आहे. त्यामुळं नवीन होंडा स्कूटरमध्ये कंपनीनं नवीन टायर कंपाऊड तंत्रज्ञानासह विकसित केलं आहे. यामधील 15 ते 20 टक्के रो़ड ग्रीप (Road Grip) देतील. यासोबतच LED हेडलॅम्प(headlamp), पासिंग स्विच, इंजिन स्टार्ट/स्टाप स्विच, डबल-लिड फ्युएल ओपनिंग सिस्टीम (Double-lid fuel opening system) यांसारखे फिचर्स आहेत.

या स्कूटरमध्ये तुम्हाला SI इंजिन मिळते, जे 7.74hp कमाल पाॅवर आणि 8.90Nm पीस टाॅर्क (torque) विकसित करु शकतं. होंडा नेहमीच त्यांचे वेगवेगळे व्हेेरियंट (Variants) ट्राय करत असते. नुकतीच लाॅन्च झालेल्या या Honda Activa H-Smart च्या सिक्युरिटी सिस्टिममुळं (Security System) ही चर्चेत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp Group

Join Now