महसूल विभागातील अधिकाऱ्याकडे सापडले ३० कोटी रुपयांचे मोठे घबाड, सर्वत्र खळबळ

On: October 1, 2025 4:00 PM
Alok Dubey
---Advertisement---

Land Scam | उत्तर प्रदेशात महसूल विभागातील एका अधिकाऱ्याकडे ३० कोटी रुपयांचे मोठे घबाड सापडल्याने खळबळ उडाली आहे. आलोक दुबे नावाच्या या महसूल अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करत कोट्यवधींची मालमत्ता जमा केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, त्याने जवळपास २९ वर्षे एकाच ठिकाणी ड्युटी केली होती. आलोक दुबे (Alok Dubey) याने २०१६ ते २०२३ या केवळ सात वर्षांच्या काळात तब्बल ४१ मालमत्ता खरेदी केल्या, ज्यांचे अंदाजित बाजार मूल्य ३० कोटी रुपये आहे. त्यांची बहुतेक मालमत्ता कानपूर येथील डूल गावात आहे. योगी सरकारने त्याला पदावरून काढून लेखपाल बनवले आहे. आलोक दुबेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.

बनावट कागदपत्रे :

सामान्यतः साधे जीवन जगणाऱ्या पदावर असतानाही आलोक दुबे कडे मात्र करोडोची संपत्ती मिळाली आहे. त्याने वादग्रस्त जमीन व्यवहारांमध्ये संगनमत केले, खोट्या नोंदी केल्या आणि बनावट कागदपत्रे तयार करून कोट्यवधींची माया गोळा केल्याच्या आरोपावरून जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आलोक दुबेवर कठोर कारवाई केली आहे.

चौकशीत ८.६२ हेक्टर जमीन आलोक दुबे आणि प्रादेशिक लेखपाल अरुणा द्विवेदी यांच्या नावे आढळली. त्यांनी कायदेशीर बंदी असलेल्या जमिनींवरही वारसा हक्क नोंदणी करून नंतर करार केले आणि त्या खासगी कंपन्यांना विकल्या. ‘आरएनजी इन्फ्रा’ नावाच्या एका कंपनीलाही जमीन विकल्याचे उघड झाले आहे.

Land Scam | आलोक दुबे बऱ्याच काळापासून चर्चेत

कानपूरच्या जमीन व्यवसायासाठी आलोक दुबे (Alok Dubey) याचे नाव बऱ्याच काळापासून चर्चेत होते. वादग्रस्त जमिनींवर वारसा हक्क नोंदणी करून नंतर करार आणि विक्री करार करत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. तक्रारी वाढू लागल्यावर, प्रशासनाने कारवाई केली. चौकशीत दुबेने सिंहपूर कठहार आणि रामपूर भीमसेन येथील दोन जमिनींवर वारसा हक्क नोंदणी करून करार केले होते, या जमिनींवर कायदेशीर बंदी असतानाही. यापैकी एक जमीन आरएनजी इन्फ्रा नावाच्या खाजगी कंपनीला विकण्यात आली.

२०१६ ते २०२३ दरम्यान आलोक दुबे याने कोट्यवधींची मालमत्ता जमवली आहे. त्यांची बहुतेक मालमत्ता डूल गावात आहे. त्यांनी दोन महिन्यांत डूल गावात त्याच्या मुलाच्या नावावर तीन तुकड्या जमीन हस्तांतरित केली. २०२३ मध्ये सर्वाधिक जमिनीची नोंदणी झाली. मे २०२३ मध्ये आलोकने चार तुकड्या जमिनीची नोंदणी केली. त्यानंतर, त्याच वर्षी ऑगस्टमध्ये एक जमीन, सप्टेंबरमध्ये दोन, ऑक्टोबरमध्ये एक, नोव्हेंबरमध्ये तीन आणि डिसेंबरमध्ये एक जमीन विकण्यात आली.

या ऑगस्टच्या एका करारात लेखापाल अरुणा द्विवेदी देखील भागीदार होत्या. एकाच ठिकाणी दीर्घकाळ काम करून महसूल अधिकाऱ्याने केलेला हा जमीन घोटाळा सध्या उत्तर प्रदेशात चर्चेचा विषय ठरला आहे.

News title : Alok Dubey land scam

Join WhatsApp Group

Join Now