अशोक चव्हाणांवर भाजपकडून जमीन घोटाळ्याचे आरोप, ‘त्या’ ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

On: February 12, 2024 5:10 PM
Ashok Chavan
---Advertisement---

मुंबई | माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत आमदारकीचा देखील राजीनामा दिला आहे. लवकरच त्यांचा भाजपमध्ये (BJP) प्रवेश होणार असल्याचं बोललं जात आहे. यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

चव्हाण यांचं वर्चस्व आणि वजन पाहता त्यांच्या पक्ष प्रवेशाला भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहू शकतात. काँग्रेसचे आणखी काही आमदारही अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या पाठोपाठ राजीनामा देऊ शकतात. तशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र चव्हाण ज्या पक्षात जायचा विचार करतायेत त्याच पक्षातील नेत्यांनी चव्हाणांवर घोटाळ्याचे आरोप केलेले. सध्या भाजपने केलेलं एक जुनं ट्विट चर्चेत आलं आहे. यात भाजपने अशोक चव्हाणांवर जमीन घोटाळ्याचे आरोप केले होते.

अशोक चव्हाणांवर भाजपकडून जमीन घोटाळ्याचे आरोप

आदर्श प्रकरणात अशोक चव्हाणांवर आरोप झाले. तेव्हा भाजप विरोधात होता. आता परिस्थिती उलट आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा पाठी लागल्यानं काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. सध्या आदर्श प्रकरणाची सध्या चर्चा नाही. पण चव्हाण अधिक सक्रिय झाल्यास हे प्रकरण चर्चेत येऊ शकतं. मात्र त्याआधीच चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याचं दिसतंय. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येत असताना चव्हाणांच्या आदर्श प्रकरणाची चर्चा सुरू झाली होती. भाजपमध्ये गेल्यास यंत्रणांचा ससेमिरा थांबतो असा अनेक नेत्यांचा अनुभव आहे.

दरम्यान, भाजपने ईडीची (ED) भीती दाखवल्याने अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला असल्याचा आरोप काँग्रेस नेते करताना दिसत आहेत. वारंवार छापा आणि प्रेशर टाकून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. भाजपने ईडीची भीती दाखवल्याने अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेससाठी दुर्दैव गोष्ट आहे. पण ही भाजपचे तंत्रच आहे, प्रेशर आणि ब्लॅकमेल केलं जातं, असं प्रणिती शिंदे म्हणाल्यात.

 

ट्विटमध्ये काय म्हटलंय?

अशोक चव्हाण महसूलमंत्री असताना पुण्यातील मोक्याच्या ठिकाणची 102 एकर जागा एका खाजगी बिल्डरच्या घशात केवळ 4 हजार 058 रुपयांत घातली होती. या जागेची मूळ किंमत 2500 कोटी रुपये एवढी होती.

1

महत्त्वाच्या बातम्या- 

देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने काँग्रेसचं टेंशन आणखी वाढलं, म्हणाले…

अभिषेक बच्चनने ऐश्वर्या सोबतच्या भांडणाबाबत केला मोठा खुलासा, म्हणाला..

‘कोणी आपल्या वडिलांना घरातून बाहेर काढतं का?’; सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सवाल

“आमिर खानची पत्नी म्हणून राहिले असते तर..”, Kiran Rao चं धक्कादायक वक्तव्य

“माझ्यासोबत राजकारणात…”, पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now