‘घरी बोलवलं, बेडवर ढकलून बळजबरीने…’; अलिबागमधील घटनेने महाराष्ट्र हादरला

On: October 28, 2025 1:22 PM
Pune Crime News
---Advertisement---

Alibaug Crime | रायगड (Raigad) जिल्ह्यातील पर्यटनस्थळ अलिबागमध्ये (Alibaug) एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मित्रासोबतचा फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणाने पीडितेला घरी बोलावून तिच्यासोबत गैरवर्तन केले. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

फोटो व्हायरल करण्याची धमकी, घरात बोलावून गैरवर्तन

पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, हा धक्कादायक प्रकार १ मे २०२४ ते १९ ऑक्टोबर २०२५ या प्रदीर्घ कालावधीत घडला. आरोपी तरुणाने पीडितेचा तिच्या एका मित्रासोबत असलेला फोटो मिळवला होता. हा फोटो कुटुंबियांना दाखवण्याची आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिला वारंवार आपल्या घरी बोलवत असे.

याच धमकीचा वापर करून त्याने एके दिवशी मुलीला घरी बोलावले. घरात कोणी नसताना त्याने दरवाजाला आतून कडी लावली आणि तिला बळजबरीने बेडवर ढकलून दिले. आरोपीने तिच्या शरीराला अश्लीलपणे स्पर्श करत तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

Alibaug Crime | पोलिसांत गुन्हा दाखल, पॉक्सो अंतर्गत कारवाई

या छळाला कंटाळून अखेर पीडित अल्पवयीन मुलीने अलिबाग पोलीस ठाण्यात (Alibaug Police Station) धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी गांभीर्याने दखल घेत आरोपी तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ (BNS 2023) नुसार कलम ७५, ७६, ७७, ७८, ७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

यासोबतच, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यांतर्गत (POCSO Act) कलम ८, १२ आणि १७ नुसारही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्योत्स्ना मासे (Jyotsna Mase) करत आहेत. पर्यटनस्थळ असलेल्या अलिबागमध्ये (Alibaug) घडलेल्या या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

News title : Alibaug Minor Assault Photo Blackmail

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now