राहा कपूरची चाचूसोबत फुल्ल धम्माल-मस्ती; क्युट व्हिडीओ तूफान व्हायरल

On: May 5, 2024 8:10 PM
Alia-Ranbir Daughter
---Advertisement---

Alia-Ranbir Daughter | रणबीर-आलियाची मुलगी राहा कपूर नेहमी चर्चेत असते. इतर स्टारकिड्सप्रमाणे राहा देखील नेहमी चर्चेत असते. राहाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ती आपले काका अयान मुखर्जीसोबत फिरायला गेली होती. तिचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. पापाराझी कायमच राहाला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी उत्सुक असतात.

रणबीर-आलियाची लेक राहाची धमाल

व्हायरल व्हिडिओ मध्ये राहा आपल्या काकासोबत मुंबईच्या एका कॅफेबाहेर जाताना दिसत आहे. तिच्या हातामध्ये एक पाकिट देखील आहे. ती त्या पाकिटासोबत खेळताना दिसत आहे. त्यावेळी राहाच्या चेहऱ्याचे हावभावने लोकांची मनं जिंकली आहेत. एका नेटकऱ्याने ‘राहा ही तिची आई आलिया भट्टची कार्बन कॉपी’, असल्याची कमेंट केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)


राहा कपूरचा जन्म हा 6 नोव्हेंबर 2022 रोजी झाला. तिचा पहिला लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. राहाला अनेक ठिकाणी स्पॉट करण्यात आलं आहे. दरम्यान काही दिवसांआधी नितू कपूर यांनी आपल्या सोशल मीडियावर एक बनवलेला व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओत राहा ही आपले दिवंगत आजोबा ऋषी कपूर यांच्या कडेवर दिसत होती.

रणबीर आणि आलियाचे आगामी सिनेमे

रणबीर कपूर हा त्याच्या आगामी सिनेमा रामायणमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर आलिया भट्ट ही तिच्या आगामी जिगरा या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

दरम्यान, नुकताच रणबीरचा अॅनिमल नावाचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याची आजही चर्चा आहे. त्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धिंगाणा घातला होता. त्यामध्ये बॉबी देओल, रणवीर कपूर, साऊथ इंडियन अभिनेत्री रष्मिका मंदाना या सिनेमात पाहायला मिळाल्या. तर दुसरीकडे तृप्ती डिमराने देखील या सिनेमाच्या माध्यमातून आपला चाहता वर्ग कमावला आहे.

आलिया आपली लेक राहाच्या जन्मापासून मनोरंजनसृष्टीपासून लांब आहे. मात्र आता तिने पुन्हा एकादा मनोरंजनसृष्टीत कमबॅक केलंय. जिगरा या आगामी चित्रपटातून आलिया प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

News Title – Alia-Ranbir Daughter Raha kapoor Viral Video

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp Group

Join Now