Madhuri Dixit | बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) अनेक कारणाने चर्चेत असते. तिच्या अभिनयाचा, चित्रपटांचा, गाण्याचा मोठा चाहता वर्ग आहे. तिने 70 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत माधुरीचा (Madhuri Dixit) चाहता वर्ग आहे. सध्या तिचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत नाहीत, पण याचा अर्थ असा नाही की तिने मनोरंजन क्षेत्र सोडलं आहे. ती रियालिटी शोच्या माध्यमातून दिसते. आता ती एका वेगळ्या कारणाने चर्चेत आलीये. (Madhuri Dixit)
90 च्या शतकातील इतर अभिनेत्रींंपैकी माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) चा चाहता वर्ग आजही मोठा दिसून येतो. याच काळात माधुरीला एका चित्रपटात काम करण्याबाबत ऑफर आली होती. एका दिग्दर्शकाने आपल्या चित्रपटात एका सीनसाठी ब्लाऊज काढून ब्रा दाखवावी लागेल अशी अट माधुरीला केली होती. यावर माधुरीने होकार दिला होता.
“ब्लाऊज काढून ब्रा दाखवावी लागेल”
हिंदी मनोरंजनसृष्टीतील दिग्दर्शक टीनू आनंद यांनी एका रेडिओला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत माधुरी दीक्षितला ‘शनाख्त’ चित्रपटाच्या सीनसाठी ब्लाऊज काढून ब्रा दाखवण्यासाठी सांगितलं होतं. त्यावर माधुरीने होकार कळवला होता. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत माधुरी दीक्षितने स्क्रिन शेअर केली होती. त्यावेळी सीन शूट करत असताना माधुरीने नकार दिला. याबाबत दिग्दर्शक टीनू आनंदने मोठा खुलासा केला आहे.
दिग्दर्शक टीनू आनंदने केला मोठा खुलासा
मुलाखतीत बोलत असताना टीनू आनंद यांनी सांगितलं, माधुरीची चित्रपटामध्ये निवड केली होती. त्यानंतर माधुरीला ब्लाऊज काढून ब्रा दाखवावी लागेल असं सांगितलं. त्यावेळी माधुरीने सीनबाबत होकार दिला. मात्र चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी मी तो सीन शुटिंगसाठी ठेवला होता. मात्र माधुरीने तो सीन करण्यासाठी नकार दिला. मग माधुरीला घरचा रस्ता दाखवण्यात आला.
ब्लाऊज काढून ब्रा दाखवण्यात यावं अशी दिग्दर्शकाची सीनसाठी मागणी होती. मात्र माधुरी असा सीन देण्यासाठी तयार नव्हती. म्हणून माधुरीने हा सीन करण्यासाठी नकार दिला. यामुळे दिग्दर्शकाने माधुरीला घरचा रस्ता दाखवला. अभिनेत्रीच्या एका सीनमुळे सिनेमा होऊ शकला नाही.
माधुरीने बकेट लिस्ट नावाच्या मराठी सिनेमात देखील काम केलं आहे. या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. माधुरीच्या 90 व्या शतकांच्या गाण्याचा आजही चाहता वर्ग आहे. तिची किंचितही क्रेझ कमी झालेली नाही. तिने ‘झलक दिखलाजा’, या रियालिटी शोमध्ये परिक्षक म्हणून काम केलं होतं.
News Title – Madhuri Dixit Was Asked Remove Blouse Shoot In Bra Film Director Demand
महत्त्वाच्या बातम्या-
कुणाची बाजू?, भाऊ श्रीनिवास यांचा धक्कादायक गौप्यस्फोट
कंगनाची जीभ घसरली!, प्रचाराच्या गडबडीत ‘या’ बड्या भाजप नेत्यावरच केली टीका
बँकेचे कामे उरकून घ्या;’या’ दिवशी शहरातील बँका राहणार बंद
“अजिबात एक रूपया सोडायचा नाही, पण…”; धैर्यशील मोहिते-पाटलांचं मोठं वक्तव्य
“रोहित पवारांना अटक झाली तरी मी…”; राजेंद्र पवारांच्या वक्तव्याने खळबळ






