मद्यप्रेमींनो सावधान!, विषारी दारू सेवनामुळे 17 जणांचा मृत्यू

On: May 14, 2025 7:18 PM
Pune ganeshotsav 2025
---Advertisement---

Alcohol News | पंजाबमधील अमृतसर (Amritsar) जिल्ह्यातील कथूनंगल भागात विषारी दारू सेवनामुळे १७ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. स्थानिक स्तरावर तयार करण्यात आलेल्या दारूमुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

 नक्की काय घडलं?

सर्व मृत व्यक्ती कथूनंगल येथील रोजंदारीवर काम करणारे मजूर होते. हे मजूर भोपाली, पातळेश्वर, मरी कलां आणि शेरेवाल गावातील रहिवासी होते. त्यांनी रविवारी रात्री स्थानिकरीत्या तयार केलेली अवैध दारू (Alcohol News) सेवन केली होती. त्यानंतर काही वेळात त्यांना उलट्या, श्वास घेण्यात अडचणी आणि बेशुद्ध होण्यासारखी लक्षणं दिसून आली. या लक्षणांमुळे नंतर त्यांच्या मृत्यूची नोंद झाली. घटनास्थळी पोलीस आणि आरोग्य विभागाचे अधिकारी दाखल झाले असून, चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पोलीस आणि आरोग्य विभागातर्फे चौकशी सुरू

पोलीस तपासात समोर आले आहे की, मृत व्यक्तींनी खाजगी ठिकाणी तयार केलेली बनावट दारू विकत घेतली होती. ही दारू (Alcohol News) अत्यंत विषारी रसायनांनी भरलेली होती. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेबाबत मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी तीव्र दुःख व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले की, “पंजाबच्या कोणत्याही भागात अवैध दारू विक्रीला माफ नाही. मृत्यूस जबाबदार असलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई केली जाईल.” सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, पोलिसांनी दारू विक्री करणाऱ्या ठिकाणी छापे मारण्यास सुरुवात केली आहे.

News Title – alcohol news 17 Dead from Toxic Liquor

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now