अक्षय शिंदेच्या मृत्यूचं खरं कारण समोर, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

On: September 25, 2024 8:11 AM
Badlapur Encounter
---Advertisement---

Akshay Shinde | बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी एन्काऊंटर करण्यात आला. पोलिसांवर त्याने आधी हल्ला केला. त्यामुळे पोलिसांनी बचावासाठी अक्षयवर गोळी झाडली, यात त्याचा मृत्यू झालाय. अक्षयचा एन्काऊंटर हा पोलीस व्हॅनमध्येच झाल्याचं स्पष्ट झालं आहे. फॉरेन्सिक लॅबच्या टीमने काल 23 सप्टेंबररोजी या व्हॅनची पाहणी केली. अशात अक्षय शिंदेचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे.(Akshay Shinde)

अक्षय शिंदेचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर

अक्षय शिंदेच्या डोक्याला एक गोळी लागल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. जेजे रुग्णालयात सात तास सुरू असलेल्या शवविच्छेदन प्रकियेची व्हिडीओग्राफी देखील करण्यात आली आहे. पाच डॉक्टरांच्या पॅनलने शवविच्छेदन केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याच्या डोक्यात गोळी लागल्यानं अतिरक्तस्त्राव  झाला. यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड झालं आहे. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात अक्षयच्या डोक्यात गोळी लागल्याचं स्पष्ट झालंय.

अक्षय शिंदेच्या आई-वडिलांचा गंभीर आरोप

अक्षय शिंदेचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. जवळपास सात तास अक्षयचे पोस्टमार्टम करण्यात आले. मात्र, अजूनही त्याचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आलेला नाही. अक्षय शिंदेचा मृतदेह कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

या प्रकरणी अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. मुख्य पुरावे नष्ट करण्यासाठीच अक्षय शिंदेची हत्या केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या आईने देखील पोलिसांवर अनेक आरोप केले आहेत. पोलिसांना पैसे देऊन माझ्या मुलाला मारण्यात आलं, असं अक्षयच्या (Akshay Shinde) आईने म्हटलं आहे.

News Title : Akshay Shinde Postmortem Report

महत्वाच्या बातम्या –

आज ग्रहमान कोणत्या राशीला साथ देतील?, वाचा मेष ते मीनचे राशीभविष्य

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर अजित पवारांचं मोठं भाष्य!

गोळ्या घालून नाही तर… तुडवून मारायला पाहिजे होतं; उदयनराजेंची बेधडक प्रतिक्रिया

अक्षय शिंदेच्या एन्काउंटर मागची कथा खरी की खोटी?

‘आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही’; संजय शिंदेेंनी केला गौप्यस्फोट

Join WhatsApp Group

Join Now