अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर अजित पवारांचं मोठं भाष्य!

On: September 24, 2024 5:43 PM
Ajit Pawar
---Advertisement---

Ajit Pawar l बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. मात्र आता या लैंगिक अत्याचार (Badlapur Case) प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला आहे. या घटनेत अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून एका पोलीस कर्मचाऱ्यावर देखील गोळी झाडल्याची घटना घडली होती.

बदलापूर घटनेवरून राजकीय वातावरणं तापलं :

या घटनेवेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे (Akshay Shinde Death) याचा मृत्यू झाला. अशातच आता या प्रकरणावरून राजकीय वातावरणं चांगलचं तापलं आहे. या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. या घटनेवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

Ajit Pawar l अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया :

बदलापूर अत्याचार घटनेतील आरोपी अक्षय शिंदे ह नराधम होता, त्याने केलेल्या कृत्यानंतर बदलापूर प्रचंड संतप्त होते. तसेच महिला असुरक्षित म्हणून विरोधक देखील वारंवार ओरडत होते. तसेच त्या विकृताने पोलीसाचे हत्यार घेवून देखील पोलिसांवर फायारींग केले आणि त्या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे.

या घटनेवेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ आरोपी अक्षय शिंदेला मारल. मात्र मी समर्थन करीत नाही त्याची चौकशी देखील होईल. मात्र, आता राज्याचं याचे राजकारण विरोधक करत आहेत. तसेच मृत अक्षय शिंदेला त्याची पत्नीही विकृत म्हणते, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं आहे.

News Title : Ajit Pawar Statement On Akshay Shinde Encounter 

महत्वाच्या बातम्या –

गोळ्या घालून नाही तर… तुडवून मारायला पाहिजे होतं; उदयनराजेंची बेधडक प्रतिक्रिया

अक्षय शिंदेच्या एन्काउंटर मागची कथा खरी की खोटी?

‘आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही’; संजय शिंदेेंनी केला गौप्यस्फोट

अक्षय शिंदेच्या पोस्टमार्टमचा व्हिडीओ रेकॉर्डिंगमधून खुलासा होणार?

बाजारात ‘या’ मोबाईल कंपनीने उडवली खळबळ; 5000GB डेटा मिळणार

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now