Akshay Shinde | बदलापूरातील शाळेत लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने (Akshay Shinde) पोलिसांची बंदूक हिसकावली. यानंतर पोलिसांनी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एनकाऊंटर केल्याची माहिती आता समोर आली आहे.
बदलापुर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याने पोलिसांवर देखील गोळीबार केल्याची माहिती आहे. तळोजा कारागृहातून साडेपाच वाजता त्याला घेऊन बदलापूरला जात असताना ही घटना घडली आहे. कळवा रुग्णालयात त्याचा मृत्यू झाल्याचंही सांगितलं जात आहे.
पोलिसांची बंदूक हिसकावली
अक्षयने व्हॅनमध्येच पोलिसांवर गोळीबार केला. त्याने तीन राऊंड फायर केलं. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याने पोलिसांच्या पायांवर गोळीबार केला. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला.
पोलिसांची बंदूक हिसकावून घेत त्याने पोलिसांवर गोळी झाडली. या घटनेत आरोपी अक्षय शिंदेचा मुत्यू झाल्याची माहिती आहे. पोलिसांकडून अजून या बाबतीत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आरोपीने शाळेतील अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता.
दरम्यान, अक्षयचा एन्काऊंटर करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अक्षयने स्वत:वर गोळी झाडली की आणखी काही दुसरं आहे. त्याला कोणी गोळी घातली की आणखी काही आहे? याची सीबीआयकडून चौकशी केली पाहिजे, अशी मागणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सर्वात मोठी बातमी! बदलापूर प्रकरणातील आरोपीने स्वत:वरच झाडून घेतली गोळी
कुणबीच्या तीन पोटजातींचा OBC मध्ये समावेश; मंत्रिमंडळाने घेतले 24 मोठे निर्णय
PM किसान योजनेचा 18 वा हप्ता कधी जमा होणार? महत्वाची माहिती समोर
नवऱ्याचा लटकलेला मृतदेह, पत्नीची खाली हळदी-कुंकवाने पूजाअर्चा; इथं घडली धक्कादायक घटना
आनंदाची बातमी! राज्यातील लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार तिसरा हप्ता






