आनंदाची बातमी! राज्यातील लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार तिसरा हप्ता

On: September 23, 2024 3:46 PM
Ladki Bahin Yojana
---Advertisement---

Ladki Bahin Yojana l राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योवजना राबवली आहे. या योजनेच्या अंतर्गत महिलांना प्रतिमहा 1500 रुपये सरकार देत आहे. अशातच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. या योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत. अशातच आता महिला तिसऱ्या हप्त्याची कधी वितरित होणार आहे याची तारीख समोर आली आहे.

कधी पर्यंत अर्ज करता येणार? :

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरणे येत्या 29 सप्टेंबर रोजी होणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती महिला व बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. या निर्णयानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना1500 रुपये मिळणार आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योनजेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना आतापर्यंत जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे हप्ते आलेले आहेत. तसेच ज्या महिलांनी अद्यापही अर्ज केला नाही अशा महिला अजूनही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकतात. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत.

Ladki Bahin Yojana l आदिती तटकरे यांनी दिली माहिती :

राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम हा येत्या 29 सप्टेंबर 2024 रोजी रायगड येथे होणार आहे. हा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम असणार आहे.

त्यामुळे या कार्यक्रमात सप्टेंबरपर्यंत आलेल्या अर्जाचा लाभ वितरीत करण्यात येणार आहे. याशिवाय ज्या अर्जात त्रुटी राहिल्यामुळे अनेक महिलांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे आता या तिसऱ्या हप्यात अशा महिलांना लाभ दिला जाणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

News Title : Mazhi Ladki Bahin Yojana Third Installment Date

महत्वाच्या बातम्या-

संभाजीराजेंचा सरकारला इशारा; काही झालं तर सरकार जबाबदार

सतर्क! आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता

‘वंदे भारत’चे चाक ‘या’ जिल्ह्यात तयार करणार; तरुणांना मिळणार मोठा रोजगार

पितृपक्षात पितर नाराज असतील तर घडतात ‘या’ अशुभ घटना!

अजितदादांची गरज संपली, भाजपकडून आता काटा काढण्याचा प्लॅन?; राऊत स्पष्टच बोलले

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now