अभिनेता अक्षय कुमार करणार राजकारणात एंट्री, मतदारसंघही ठरला?

On: March 2, 2024 12:04 PM
Akshay Kumar
---Advertisement---

Akshay Kumar | गेल्या अनेक दिवसांपासून काही कलाकार राजकारणात एंट्री करणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यात अभिनेत्री कंगना रनौत, अभिनेता अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी यांच्या नावाची अधिक चर्चा आहे. आता अक्षय कुमार (Akshay Kumar) नेमका कोणत्या मतदारसंघातून उभा राहणार, इथपर्यंत या चर्चा होत आहेत.

बॉलिवूडचा मिस्टर खिलाडी म्हणून प्रचलित असलेला अक्षय कुमार हा भाजपच्या तिकीटावर आगामी लोकसभा निवडणूक लढवू शकतो, असं वृत्त मध्यमात झळकत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत.

अक्षय कुमार लोकसभा निवडणूक लढणार?

राजधानी दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने युती करून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता या युतीपुढे मोठं आव्हान उभं करण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचं म्हटलं जातंय. या ठिकाणी भाजपकडून मोठे उमेदवार रिंगणात उतरवले जाऊ शकतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी 4 तर काँग्रेस 3 जागांवर निवडणूक लढणार आहे. इथे बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला भाजपाकडून संधी दिली जाऊ शकते, अशा जोरदार चर्चा आता होत आहेत. अक्षय कुमार (Akshay Kumar) याला दिल्लीच्या चांदनी चौक मतदारसंघातून निवडणुकीचं तिकीट दिलं जाऊ शकतं.

दिल्लीतील ‘या’ ठिकाणी भाजपकडून लढण्याची शक्यता

भाजप नेते डॉ. हर्षवर्धन यांनी 2014 आणि 2019 मध्ये दोन वेळा या जागेवर विजय मिळवलाय. आता या मतदारसंघातून अक्षय कुमारच्या नावाची चर्चा होत आहे. मात्र, अक्षय कुमारने याबाबत अधिकृत अशी कोणतीच माहिती दिली नाहीये. त्यामुळे तो निवडणूक लढवणार की नाही, याबाबत अजून तरी शंकाच आहे.

सध्या अभिनेता ‘ बडे मियाँ छोटे मियाँ’ सिनेमात व्यस्त आहे. तो या सिनेमात टायगर श्रॉफसोबत दिसणार आहे. हा चित्रपट 9 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, चित्रपटापेक्षा अक्षय कुमारबद्दल (Akshay Kumar) राजकारणात जास्त बोललं जातंय.

News Title : Akshay Kumar likely to contest Lok Sabha elections

महत्त्वाच्या बातम्या-

महाशिवरात्रीचा उपवास करत असाल तर ‘या’ चूका करू नका

‘अशा’ व्यक्तींकडे कितीही कमावले तरी पैसे टिकत नाही!

धक्काबुक्की का झाली?; महेंद्र थोरवेंनी सांगितलं खरं कारण

अल्पवयीन मुलीसोबत घडला भयानक प्रकार, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

Join WhatsApp Group

Join Now