उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाहतूक नियम बसवले धाब्यावर, उलट्या दिशेनं हाकली वाहनं!

On: April 25, 2024 9:31 PM
Ajit Pawar
---Advertisement---

Ajit Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यामुळे राज्यातील लोकसभा निवडणूक 2024 ला रंग आलेला पाहायला मिळत आहे. आपल्या काकांना सोडून ते भाजपसोबत गेले आहेत. आता बारामती लोकसभा मतदारसंघातून पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी घेतलेल्या भूमिकांमुळे राज्यातील राजकारण बदललं आहे. अशातच आता ते एका वेगळ्या कारणाने चर्चेत आले आहेत. अजित पवार (Ajit Pawar) हे आज पुणे येथे गेले असता. त्यांच्या ताफ्याने वाहतुकीचे नियम मोडीत काढत उलट्या दिशेने गाड्या फिरवल्या आहेत. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौकात हा प्रकार घडलेला पाहायला मिळाला आहे. पुण्यात भाजपचे उमेदवारी मुरलीधर मोहोळ यांच्या निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) आले होते. तेव्हा हा प्रकार घडला.

अजित पवार (Ajit Pawar) हे शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आढळराव पाटील आणि पुणे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. तेव्हा मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आलं.

अजित पवार यांचा ताफा उलट्या दिशेने

अजित पवार हे पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आढळराव पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते कार्यालयातून बाहेर आले. तेव्हा गाड्यांचा ताफा बाहेर आला. पोलिसांनीही त्यांना अडवले नाही. पण उपमुख्यमंत्र्यांचा ताफा मात्र उलट्या दिशेने सुसाट गेल्याचं पाहायला मिळालं. अजित पवार यांचा उलट्या दिशेने वाहनांचा ताफा गेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान पुण्यामध्ये आज मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यात आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आलं होतं. रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य झालं होतं. थंड प्येय, खाद्यपदार्थांचे डब्बे याचा कचरा जामा झाला होता. त्याचे बरेचसे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

पुण्यात तिरंगी लढाई

दरम्यान पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली. तर महायुतीकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. आता हे तिघेजण एकमेकांविरोधात लढणार आहेत. पुणेकर कोणत्या मतदाराच्या बाजूने कौल देणार हे पाहणं गरजेचं आहे.

News Title – Ajit Pawar violated Traffic Rules In Pune

महत्त्वाच्या बातम्या

अनंत गीते यांना रायगड लोकसभा मतदारसंघातून प्रचंड विरोध; मतदारांनी बॅनरबाजी करत केला रोष व्यक्त

“पंकजा मुंडेंना पाडण्यासाठी धनंजय मुंडेंचा डाव?”

मोठी बातमी! नरेंद्र मोदी यांना निवडणूक आयोगाने बजावली नोटीस

चिन्मय मांडलेकरच्या लेकासाठी सुप्रिया पिळगावकरांची पोस्ट, म्हणाल्या…

एसी किंवा कूलरशिवायही घर होईल थंड; फक्त फॉलो करा ‘या’ टिप्स

Join WhatsApp Group

Join Now