मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. शरद पवारांनी 2014 साली भाजपला दिलेल्या पाठिंब्याचा पुनरुच्चार करत अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय.
राज्यातील वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी, आपली कामं होण्यासाठी, बहुजन समाज, वंचित, गरीब, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक वर्गाचं भलं होण्यासाठी आपण ही भूमिका घेतली आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.
2014 साली आमच्या वरिष्ठांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. तेव्हा आम्ही गप्प बसलो. त्यांनी घेतलेला निर्णय आम्ही मान्य केला. अशा अनेकदा घटना घडल्या आहेत, असं अजित पवार म्हणाले.
आम्हीही 30-35 वर्षे समाजकार्य-राजकारण केलं आहे. आम्हीही वरिष्ठांचा मान राखला आहे. वरिष्ठांचा आदर केला आहे. वरिष्ठांनी जे सांगितलं त्याची अंमलबजावणी केली आहे, हे सगळ्यांना माहीत आहे, असंही अजित पवारांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-






