“हा फूलस्टॉप नसून कॉमा आहे, अजूनही काहीही होऊ शकतं”

On: April 18, 2023 6:47 PM
---Advertisement---

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) नेते विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार सोबत घेऊन भाजप सोबत सत्ता स्थापन करेल अशा चर्चा राज्यात सुरू आहे. असं असताना स्वतः अजित पवार (Ajit Pawar) यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या बाबत पसरवला जाणाऱ्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवारांच्या वक्तव्यावर राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी यांनी प्रतिक्रिया देत मोठं वक्तव्य केलं आहे. यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवारांनी जे आज काही वक्तव्य केलं ते फूलस्टॉप नसून कॉमा आहे, यापुढे अजूनही काहीही होऊ शकतं, असं राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी म्हटलं आहे

गेल्या काही दिवसांत राज्यात जे काही वातावरण आहे, कोण गायब आहे, कुणाचे फोण ॲाफ आहेत या सगळ्यावरुन लक्ष हटवण्यासाठी अजित पवार महाराष्ट्र भूषणाचा विषय घेत आहेत, असंही उदय सामंत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now