पुणे | कंत्राटी भरतीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या मुद्द्यावर आज भाष्य केलं. तसेच विरोधकांनी केवळ अपप्रचार केल्याचा दावा त्यांनी केला.
अजित पवार (Ajit Pawar) पुण्यातील नदी सुधार प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी आज पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी घाटावर वृक्षारोपणही केलं. त्यानंतर ते मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी कंत्राटी भरतीवर भाष्य केलंय.
कंत्राटी भरतीवर विरोधकांकडून अपप्रचार करण्यात आला. तुमच्या नोकऱ्या काढून घेतल्या जातील असं सांगितलं गेलं. मात्र वस्तुस्थिती वेगळी होती. कॅबिनेटमध्ये हा विषय आला होता. तेव्हा मी पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती मांडतो असं देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis) म्हणाले. त्यानुसार त्यांनी वस्तुस्थिती मांडली आहे, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
आपण दीड लाख नोकर भरती करत आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली. आता कोणी माफी मागायची आहे हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केलं आहे, असा टोलाही अजितदादांनी विरोधकांना लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-






