“आमच्या डोक्यात प्रकाश पडायला…”, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार

On: May 1, 2024 4:02 PM
Ajit pawar
---Advertisement---

Ajit Pawar | बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार आणि शरद पवार यांच्यात बारामतीची जागा मिळवण्यासाठी वॉर सुरू आहे असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. दोन्ही गटातून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. बारामतीच्या खासदार आणि शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी माझ्यात वाईट गुण होते तर इतके दिवस शांत का राहिलात?, असा सुप्रिया सुळेंनी सवाल केला. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्या स्टाईलने सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर दिलंय. आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्षे लागली, असं म्हणत अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर दिलं.

अजित पवार यांचं प्रत्युत्तर

महाराष्ट्र दिनानिमित्त पुणे येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी बोलत असताना सुप्रिया सुळे यांच्यावर पलटवार करत माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि थेट विषयच संपवून टाकला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्याविरोधात बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून उमेदवारी देण्यात आलीये. यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे गणित बिघडलं आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी महायुतीसोबत हात मिळवणी केल्याने भाजपने शरद पवार यांचा बारामती बालेकिल्ला मिळवण्यासाठी राजकारण केल्याच्या चर्चा आहेत.

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गटातून प्रचार होताना दिसत आहेत. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या सभेला तूफान गर्दी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे शरद पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातील खेडेगावत जात आपल्या नवीन तुतारी चिन्हाचा लोकांना परिचय करून देताना दिसत आहेत.

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?

खडकवासला मतदारसंघात सुप्रिया सुळे यांची सभा झाली. तेव्हा सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना सवाल केलेला. 17-18 वर्ष आम्ही एका संघटनेत काम केलंय. घटस्फोट होऊन सहाच महिने झाले आहेत.

इतके माझ्यात वाईट गुण होते तर साडेसतरा वर्षे गप्प का बसलात?. असं काय झालं की हे सगळं तुम्हाला आता दिसायला लागलंय. आता माझ्या चूका का दिसत आहेत?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना केला. त्यांच्या याच प्रश्नाला अजितदादांनी आमच्या डोक्यात प्रकाश पडायला सतरा वर्षे लागली असल्याचं प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिलं.

News Title – Ajit Pawar Replied On Supriya Sule Statement

महत्त्वाच्या बातम्या

‘तुमचा सेवक म्हणून…’; सुनील तटकरेंनी मतदारांना दिला शब्द

महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना दिलासा; सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

“मी जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना..”; पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

पीएफ खात्यात पैसे जमा झाले की नाही?, कसं तपासणार?; जाणून घ्या सविस्तर

‘या’ भागांत सूर्य आग ओकणार! हवामान विभागाकडून उष्णतेचा यलो अलर्ट

 

Join WhatsApp Group

Join Now