अजितदादांच्या अपघाताचं गूढ वाढलं! घातपाताचा संशय? नेमकं प्रकरण काय?

On: February 8, 2026 6:58 PM
Ajit Pawar
---Advertisement---

Ajit Pawar Plane Crash | मुंबईहून प्रचारसभेसाठी बारामतीकडे जात असताना अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आणि त्यात त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. धावपट्टीवर उतरण्याच्या प्रयत्नात विमानाचे नियंत्रण सुटले, जमिनीवर आदळताच मोठा स्फोट झाला, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर काही नेत्यांनी अपघाताबाबत संशय व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बजरंग सोनवणे यांनी अपघातावर प्रश्न उपस्थित केले :

या प्रकरणावर अमोल मिटकरी, छगन भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी आधीच शंका व्यक्त केली होती. आता बीडचे खासदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बजरंग सोनवणे (Bajrang sonawane) यांनीही या अपघातावर प्रश्न उपस्थित केले आहेत. (Ajit Pawar Plane Crash)

तसेच दोन दिवसांपूर्वी त्यांनी विमानात बॉम्ब होता का, अशी शक्यता व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

Ajit Pawar Plane Crash | ‘मी आरोप नाही, संशय व्यक्त केला आहे’ – बजरंग सोनवणे :

या घटनेबाबत बोलताना सोनवणे म्हणाले, “देश आणि महाराष्ट्राचं नेतृत्व हरवलं आहे. तळागाळातील प्रत्येक प्रश्नाची उकल अजितदादांना होती. हा प्रसंग अत्यंत दुःखद आहे. मी आरोप केलेला नाही, फक्त संशय व्यक्त केला आहे. या घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी माझी मागणी आहे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना मी भेटणार असून या प्रकरणाची योग्य चौकशी झाली पाहिजे.”

ते पुढे म्हणाले, “मी समोरासमोर बोलणारा माणूस आहे. अजित पवारांसोबत नेहमी असणारे पीए त्या दिवशी का नव्हते? त्या दिवशी फक्त गार्ड सोबत होते, हा प्रश्न निर्माण होतो. मी संसदेतही हा मुद्दा उपस्थित करणार आहे. मुख्यमंत्री यांनी योग्य चौकशी केली जाईल, असे सांगितले असून मला त्यांच्यावर विश्वास आहे.” सोनवणे यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा अपघाताच्या कारणांवर राजकीय चर्चेला वेग आला आहे.

News Title: Ajit Pawar Plane Crash: Questions Raised Over Absence of His PA, Political Storm Erupts

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now