वंचितला सोबत घेण्याबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

On: January 17, 2023 6:13 PM
---Advertisement---

मुंबई| शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची एकत्र युती करण्यासंदर्भात चर्चा सुरु होती.

मात्र प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस यांच्याविरोधात टिका केली होती. आता यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रकाश आंबेडकर यांना यावर एक नविन फॉर्म्यूला सुचवला आहे.

अजित पवार म्हणाले की, जर काही लोकांना अमच्यासोबत यायचं असेल तर आमच्याकडे येतात, आमच्यासोबत चर्चा करण्यासाठी सुद्धा येत असतात. तसेच काही लोक हे त्या त्या पक्षाच्या कोट्यातून निर्णय घेत असतात. जर काॅंग्रेसला काही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा.

जर शिवसेनेला जो कोटा दिला असेल तर त्यांनी त्या कोट्यातून निर्णय घेऊन आपल्या मित्र पक्षाला सामावून घ्यावं. तसेच राष्ट्रवादीने सुद्धा आपल्या मित्र पक्षाला आपआपल्या कोट्यातून सामावून घ्यावं, यामुळे पु्ढे अडचणी येणार नाहीत, असं अजित पवार म्हणालेत.

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची या बद्दल बैठक सुद्धा पार पडली होती. त्यानंतर राजकारणात चर्चेला उधाण आलं. शिवसेना आणि वंचित एकत्र येणार असल्याच्या चर्चा होत असल्या तरी प्रकाश आंबेडकरांनी याबाबत अधिकृत माहिती दिली नाही.

थोडक्यात बातम्या-

16 आमदारांबाबत कायदातज्ज्ञ उल्हास बापटांचं मोठं वक्तव्य!

‘बिग बाॅस’च्या निर्मात्यांना मिळाला नवा होस्ट?

शिंदे गटातील बडा नेता फसला; मोठा घोटाळा समोर

मासिक पाळीमध्ये ब्रेस्ट पेन होत असेल तर आताच व्हा सावध!

सुशांतच्या घरातील ‘या’ जवळच्या सदस्याचं निधन!

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now