हास्यजत्रा फेम अभिनेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश, अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी

On: January 31, 2023 3:42 PM
---Advertisement---

मुंबई | सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात(Maharashtra Politics) अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच काही राजकीय नेते पक्षांतर करतानाही दिसत आहेत.

त्यातच आता मराठी मनोरंजनसृष्टीतून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा'(Maharashtrachi HasyaJatra) फेम प्रभाकर मोरे(Prabhakar More) यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

मुंबईमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयात अजित पवारांच्या उपस्थितीत मोरे यांचा प्रवेश झाला. महत्वाचं म्हणजे पक्षप्रवेश होताचा अजित पवारांनी(Ajit Pawar) मोरेंवर मोठी जबाबदारी टाकली आहे.

मोरे यांना कोकण विभागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचीही जबाबदारी देण्यात आली आहे, असं पवारांनी सांगितलं आहे.

माझी सर्वसामान्य कलाकारांसाठी चांगलं काम करण्याची इच्छा आहे. सुप्रिया सुळेंचा(Supriya Sule) कलाकारांवर हात आहेच. तसेच अजित पवारांच्या स्वभावामुळं राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचे मोरे यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now