भाजपसोबत जाणार का?, अखेर अजित पवारांनी केलं स्पष्ट

On: April 18, 2023 2:22 PM
---Advertisement---

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेते विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांमुळे राज्याच्या राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. या सर्व चर्चांवर अजित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहेे.

मी आणि माझ्या सहकाऱ्यांबद्दल विनाकारण गैरसमज’ मी कोणाच्याही सह्या घेतल्या नाहीत. कारण नसताना माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत या बातम्यांमध्ये कोणतंच तथ्य नाही, असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय.

40 आमदारांच्या सह्या कुणीही घेतल्या नाही. सही घेण्याचं काहीही कारण नाही. या बातम्यांना काहीही आधार नाही. कुणी काय मत व्यक्त करावं हा त्यांचा अधिकार आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

अनेक आमदार कामानिमित्त येत असतात. आजही नेहमीप्रमाणे आमदार भेटायला आले होते. आमदारांची वेगवेगळी कामं होती, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.

महत्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now