‘कोण कोणामुळे निवडून आलंय…’, Ajit Pawar यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

On: January 5, 2024 3:27 PM
Baramati Loksabha
---Advertisement---

Ajit Pawar | राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर पक्षाचे अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार अशी दोन गट पडली आहेत. दोन्ही गटाकडून सतत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जातात. त्यातच अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्याने नवा वाद सुरू झाला. ‘गेल्या 15 वर्षांपासून अजित पवारांमुळेच सुप्रिया ताई (Supriya Sule)निवडून येत आहेत. आता अजितदादा सोबत नाही म्हणून त्यांना मतदारसंघात तळ ठोकावा लागतोय, असं चाकणकर म्हणाल्या आहेत. यावरच स्वतः अजित पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले Ajit Pawar?

“निवडून येणाऱ्याला माहित आहे कोण कोणामुळे निवडून आलंय आणि निवडून आणणाऱ्यालाही माहितेय कोण कोणामुळे निवडून आलंय.”, असं म्हणत अजित दादांनी यावर अधिकचं बोलणं टाळलं. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या ‘पक्षात फुट पडण्यापूर्वी अजित दादा दादागिरी करायचे’, या आरोपावरही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

‘मी सकाळी सहा वाजता माझ्या कामाला सुरुवात करतो. मी कामाचा माणूस आहे. त्यामुळे असली आलतू-फालतू उत्तरं देण्यासाठी मी बांधील नाही. किरकोळ किरकोळ प्रश्न ज्याला काही अर्थच नाहीये, दोन दिवस चघळायचं-चघळायंच त्याचा चोथा करायचा.’, असं म्हणत अजित पवारांनी जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावला.

Ajit Pawar यांनी केलं आवाहन

देशासह राज्यात ही सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.’सध्या तरी राज्यात कोरोना वाढू नये म्हणून सर्व खबरदारी घेतली जात आहे. मात्र, नागरिकांनीही काळजी घ्यायला हवी. सर्वांनी मास्कचा वापर करायला हवा. आम्हीही मास्क वापरायला हवा ही सध्याची सत्यस्थिती आहे.’, असं आवाहन अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना केलं आहे.

Ajit Pawar criticizes Supriya Sule

महत्त्वाच्या बातम्या- 

Sridevi च्या मृत्यूबद्दल लेक Janhvi Kapoor चा मोठा खुलासा!

IND vs SA | टीम इंडियाने 91 वर्षे जुना विक्रम मोडला; भारतानं रचला इतिहास

Jacqueline Fernandez अडचणीत; सुकेश चंद्रशेखरची पर्सनल चॅट लीक झाल्याने खळबळ

Mobile Theft | फोन चोरीला गेल्यावर करा पहिलं ‘हे’ काम; फोन लगेच मिळेल

Wheat Disease l शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; वेळीच व्हा सावध नाहीतर होईल मोठं नुकसान

Join WhatsApp Group

Join Now