Ajit Pawar | राज्यात सध्या बारामती लोकसभा मतदारसंघ अधिक चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे दोन गट झाल्याने येथे आता पवार विरुद्ध पवार असा सामना होणार आहे. शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आव्हान दिलंय. दोन्ही गटांकडून सध्या बारामतीत जोरदार प्रचारसभा घेतल्या जात आहेत.
दोन्ही गटाकडील नेते मंडळी देखील आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. अजित पवार यांनी बऱ्याच ठिकाणी कुटुंबातील गुपितंही सर्वांसमोर उघड केली आहेत. त्यामुळे बारामतीत कोण बाजी मारणार, हे आगामी काळात दिसून येईलच.
पवारांचं जुनं नातं पूर्वीसारखं होणार?
तत्पूर्वी अजित पवारांना बारामती लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर जुनं नातं पूर्वीसारखं होणार का? तुम्ही आणि शरद पवार एकत्र येणार का, असा सवाल करण्यात आला. या प्रश्नावर अजित दादांनी उत्कंठा वाढवणारं उत्तर दिलं आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते.
‘एकदा 7 तारखेला बारामतीचं मतदान होऊ द्या. तोपर्यंत मी या विषयावर काहीच बोलणार नाही. कारण सध्या बारामतीत वेगळा प्रचार सुरु आहे.’, असं अजित पवार म्हणाले आहेत. हा प्रचार लोकांना बुचकाळ्यात टाकणारा आहे. त्यासंदर्भात माझे मतदार, सहकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संदेश गेला पाहिजे की, मी जी राजकीय भूमिका घेतली त्याला मी धरुन राहणार आहे. लोकांनी मला साथ द्यावी, मोठ्यांनी आशीर्वाद द्यावेत आणि मतदारांना मला भरभक्कम पाठिंबा द्यावा’, असं आवाहनही यावेळी अजित पवारांनी केलं.
अजित पवार काय म्हणाले?
तसंच बहिणीच्या विरोधात प्रचार करताना वेदना होतात का, असा सवाल करण्यात आला असता अजित पवार (Ajit Pawar ) म्हणाले की, ‘ 7 मे पर्यंत भावनिक, मऊ व्हायचं नाही असं मी ठरवलं आहे. बारामतीच्या विकासासाठी मी प्रयत्नशील आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारला तो मिळून करता आला तर तो अधिक जलद गतीनं करता येईल.’
इतकंच नाही तर पुढे ते म्हणाले की, बारामतीची जागा लढत असताना समोरचे उमेदवार त्यांच्या परीनं प्रयत्न करत आहेत. ही लढाई भावकी किंवा गावकीची लढाई नाही. देशासाठी ही लढाई लढायची आहे. अजित पवार (Ajit Pawar ) यांनी सध्या तरी दोन्ही पवार एकत्र येणार का, यावर उत्कंठा वाढवणारं उत्तर दिलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या याची अधिक चर्चा होते आहे.
News Title- Ajit Pawar Big statement on Sharad Pawar
महत्त्वाच्या बातम्या-
महाराष्ट्रात काँग्रेसला धक्क्यावर धक्के; आणखी एका नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी
नारायण राणे सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा आला समोर
‘छत्रपती शिवरायांची क्षमा मागून…’; चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय
उष्माघाताची बातमी वाचताना अँकर स्वतःच कोसळली, Video होतोय व्हायरल
खडसेंच्या भाजप प्रवेशावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले ‘इच्छा नसतानाही…’






