‘या’ विद्यार्थींनींना मिळणार मोफत शिक्षण, अजित पवारांनी केली मोठी घोषणा

On: February 19, 2024 11:07 AM
maharashtra education
---Advertisement---

Ajit Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठी घोषणा केली आहे. ज्या अल्पसंख्यांक कुटुंबातील पालकांचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखाहून कमी असेल त्या पालकांच्या मुलींना मोफत शिक्षण दिलं जाणार आहे, अशी घोषणा अजित पवार यांनी अल्पसंख्यांक मेळाव्यात केली आहे. नवी मुंबईमध्ये मेळाव्यात वक्फ बोर्डाबाबत अनेक समस्या असून त्या सोडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती दिली आहे.

मुस्लिम समाजासाठी यंदा 15 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. आम्ही सरकारमध्ये जरीही सामिल झालो असलो तरीही स्थानिक निवडणुकांबाबत कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार निर्णय घेण्यात येणार आहे. नवी मुंबई येथे अल्पसंख्यांक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाषणामध्ये विविध मुद्दे मांडले होते.

“अल्पसंख्यांक लोकांची स्वातंत्रसंग्रामामध्ये मोलाची साथ”

अल्पसंख्यांक लोकांनी देशाच्या स्वातंत्रसंग्रामामध्ये मोलाचं काम केलं आहे. काही लोकं मुस्लिम समाजामध्ये भयाचं वातावरण निर्माण करत राजकारण करतात. आम्ही सर्वजण एकसाथ राज्य करत आहोत. जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. आपण अल्पसंख्यांक जनतेचा आदर करतो आणि प्रतिनिधित्त्व देतो असे म्हणत अजित पवार (Ajit Pawar) यांनी अल्पसंख्याक लोकांना दिलेल्या प्रतिनिधित्त्वाची यादी वाचून दाखवली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम बांधव

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुस्लिम बांधव होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवर मुस्लिम सामाजाने विश्वास दाखवला आहे. तो विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. मुस्लिम युवतींना शिक्षणास मदत केली आहे, असं ते म्हणालेत.

अजित पवार हे नवी मुंबईमध्ये अल्पसंख्याक मेळाव्यामध्ये संबोधित करत असताना त्यांनी अल्पसंख्यांक विद्यार्थीनीच्या पालकांचे 8 लाखाहून कमी उत्पन्न असेल तर त्या पालकांच्या मुलींना मोफत शिक्षण देणार असल्याचं बोललं जात आहे.

काही दिवसांआधी काँग्रेसचे माजी नेते आणि आजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकींमुळे मुस्लिम समाजाच्या उपाययोजनांवर अधिक भर दिला जाऊन युवतींना शिक्षणामध्ये मदत केली जाणार असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.

News Title – Ajit Pawar Big statement On Girls Education

महत्त्वाच्या बातम्या

पुरुषांमध्ये ‘हे’ 3 गुण असतील तर महिला होतात आकर्षित, चाणक्यांनी ठेवलंय लिहून

मोठी बातमी! कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

iPhone वापरणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

‘नरेंद्र मोदींना पुन्हा निवडून द्यायचं आहे, त्यामुळे…’; अजित पवारांचं मोठं वक्तव्य

‘या’ लोकांना हार्ट अटॅकचा सर्वात जास्त धोका, बातमी वाचून झोप उडेल

Join WhatsApp Group

Join Now