लबाड लांडग्याचं पिल्लू म्हणणाऱ्या पडळकरांना अजित पवारांनी झापलं!

On: September 25, 2023 12:52 PM
---Advertisement---

पुणे | भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर अत्यंत खोचक शब्दात टीका केली होती. पडळकरांच्या या वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं. पडळकरांनी अजित पवारांना लबाड लांडग्याचं पिल्लू म्हटलं होतं. यावर अजित पवारांनी (Ajit Pawar) खुद्द प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी पडळकरांचा जोरदार समाचार घेतला.

अजित पवारांनी पडळकरांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. मलाही बोलता येतं पण मी अशा लोकांकडे लक्ष देत नाही. हे लोक वाचाळवीर आहेत. यांनी मी एवढंच म्हणेन विनाशकाले विपरित बुद्धी, असं अजित पवारांनी म्हटलंय.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या सगळ्या बातम्या चालल्या आहेत. या गोष्टीला आता 14 महिने झाले आहेत. प्रत्येक यंत्रणा काम करते आहे. या बातम्यामध्ये काही अर्थ नाही. जो पर्यंत कुठला निकाल नाही. तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाचा विचारच नाही. मी फक्त विकासासाठी काम करतो. केवळ विकास हेच आमचं ध्येय आहे, असंही अजित पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now