“टिल्ल्या लोकांनी मला सांगायचं कारण नाही”

On: January 5, 2023 4:42 PM
---Advertisement---

मुंबई | मोठे पवार साहेब कधीही शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करत नाहीत. ते आजवर कधी रायगडावर देखील गेलेले नाहीत. तिथेही कधी नतमस्तक झालेले नाहीत, अशी टीका भाजप नेते नितेश राणे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर केली होती. याला अजित पवारांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे.

टिल्ल्या लोकांनी असलं काही सांगायचं कारण नाही. त्यांची उंची किती, त्यांची झेप किती… त्यांना मी कशाला उत्तर देऊ. माझे बाकीचे प्रवक्ते वैगरे देतील उत्तर, असं अजित पवार म्हणाले.

असल्यांच्या नादी लागत नसतो मी, असं म्हणत अजित पवारांनी नितेश राणेंच्या टीकेकडे दुर्लक्ष करा असं म्हटलं होतं.

दरम्यान, आपल्या माहितीकरता मी आपल्याला या पत्रासोबत औरंग्याने तोडलेल्या हिंदू मंदिरांची यादी देत आहे. मला खात्री आहे आपण हे तथ्य आपल्या मुघलशाहीच्या आस्थेपोटी स्वीकारणार नाही, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now