अजय देवगणने तब्बू, इलियानासोबत… ‘या’ दिग्दर्शकाने सगळं सांगून टाकलं

On: February 21, 2025 7:48 PM
ajay devgan
---Advertisement---

Ajay Devgan | काजोलने स्वतःला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देत ट्विट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या, तर आता कमाल आर खान (KRK) यांनी तिच्या आणि अजय देवगणच्या वैवाहिक आयुष्याविषयी मोठे दावे केले आहेत.

केआरकेचा मोठा दावा-

स्वतःला समीक्षक म्हणवणाऱ्या आणि माजी अभिनेता असलेल्या कमाल आर खान (KRK) यांनी काजोलच्या व्हॅलेंटाईन डे ट्विटवर प्रतिक्रिया देत मोठा दावा केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर काजोलच्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करत म्हटले की, “शेवटी @itsKajolD ला वास्तव समजले! भाऊने तब्बू (Tabu), इलियाना (Ileana D’Cruz) यांच्यासोबत खूप मजा केली.”

केआरकेच्या या ट्विटला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक युजर्सनी या प्रकरणावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. एका नेटिझनने लिहिले, “समजदाराला इशारा पुरेसा असतो!” तर एका व्यक्तीने अजय आणि काजोलची बाजू घेत लिहिले, “तुम्हाला माहीत आहे का की काजोलच्या 90% ट्विट्स तिची टीम करत असते? त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला चार दिवस उरले आहेत.

त्यामुळे वाट पाहूया, काजोल आपल्या 26व्या लग्नाच्या वाढदिवशी काय पोस्ट करते? अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया हँडल्स त्यांचे पीआर टीमें सांभाळतात.” दुसऱ्या एका युजरने लिहिले, “तुम्ही रकुलला विसरलात.” आणखी एका युजरने म्हटले, “कंगनाला पण विसरू नका!”

म्हणून चर्चेत आलं नात्यातील अंतर-

14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने काजोलने आपल्या सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेअर केला आणि लिहिले, “स्वतःला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा… मी माझ्यावर प्रेम करते! #selflove #thegreatestloveofall.” याच दिवशी अजय देवगणने (Ajay Devgan) देखील आपल्या सोशल मीडियावर एक जुना रोमँटिक फोटो शेअर करत लिहिले, “लवकरच ठरवले होते की आपलं हृदय कुणासोबत शेअर करायचं, आणि ते आजही तसंच आहे! माझी #Valentine आज आणि नेहमीच @itsKajolD.”

नात्यात बिघाड झाल्याची चर्चा-

अजय (Ajay Devgan) आणि काजोल सोशल मीडियावर अनेकदा एकमेकांसाठी रोमँटिक पोस्ट्स शेअर करत असतात. मात्र यावेळी दोघांच्या पोस्टमधील फरकामुळे त्यांच्या नात्यात बिघाड झाल्याची चर्चा सुरू झाली. त्यांच्या या पोस्ट्सवर अनेकांनी गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली.

काजोल आणि अजय देवगण यांनी 24 फेब्रुवारी 1999 रोजी लग्न केले होते. त्यांना मुलगी न्यासा (Nysa) (2003) आणि मुलगा युग (Yug) (2011) आहेत. कामाच्या आघाडीवर, अजय देवगणला शेवटचे ‘सिंघम अगेन’मध्ये पाहिले गेले, तर काजोल ‘दो पट्टी’मध्ये झळकली होती.

News Title : Ajay devgan & Kajol post get viral

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now