‘सगळे पुरस्कार ऐश्वर्यालाच….’; ‘या’ अभिनेत्याचा मोठा खुलासा

On: April 3, 2024 9:14 PM
Aishwarya Rai
---Advertisement---

Aishwarya Rai | बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय कायम आपल्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली होती. सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी अभिनेत्री सतत नवनवीन व्हिडीओ, फोटोज शेअर करत असते. ऐश्वर्याने आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. 90 च्या काळात ऐश्वर्याने आपल्या सौंदर्याने अनेकांना घायळ केलं. दरम्यान, आज देखील ऐश्वर्याची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. ऐश्वर्याचे चित्रपट लोक आवडीने पाहत असतात. सध्या चर्चा होत आहे तिला मिळालेल्या पुरस्काराची. मात्र बाॅलिवूडमधील अभिनेत्याने नाराजी व्यक्त केली आहे.

काय आहे प्रकरण?

2016 मध्ये ऐश्वर्या (Aishwarya Rai)  आणि रणदीप हुडा यांचा सरबजीत हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. सरबजीत सिंग यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये ऐश्वर्या रायने मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील कलाकारांच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं होतं.

ऐश्वर्याला (Aishwarya Rai) तिच्या भूमिकेसाठी बरेच पुरस्कारदेखील मिळाले होते. मात्र प्रशंसेचा मोठा वाटा ऐश्वर्याला मिळाल्याचं वाईट वाटलं, अशी कबुली अभिनेता रणदीपने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिली. त्याचसोबत एखाद्या कलाकाराने पुरस्कारांना एवढं महत्त्व देऊ नये, असंही त्याने म्हटलंय.

तुमच्या विकासासाठी चांगलं नाही-

यावेळी अभिनेता रणदीपला काही प्रश्न विचारण्यात आले होते. बोलत असताना रणदीप म्हणाला की, “सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे, एक कलाकार म्हणून तुम्ही जर तुमचं मूल्यमापन पुरस्कारांच्या संख्येवरून करणार असाल, तर ते तुमच्या विकासासाठी चांगलं नाही. इंडस्ट्रीतून तुमच्या कामाचं कौतुक झालं तर ते प्रेरणादायी ठरू शकतं.

परंतू मी इतकंच म्हणू शकतो की ऐश्वर्याला जे काही मिळालं, त्यात मी खुश आहे. मला जरी मिळालं नसलं तरी मी आनंदी आहे. त्याबाबत आता तक्रार करणं अयोग्य ठरेल. जर लोकांनीच ही गोष्ट उचलून धरली, तर त्यातच माझा विजय आहे, असं रणदीप म्हणाला.

मला वाईट वाटलं-

पुढे तो म्हणाला की, मला वाईट वाटलं का? तर अर्थात वाटलं होतं. पण त्याचा अर्थ असा नाही जग तिथेच संपलं. तुम्ही पुढे निघून जाता.

News Title : aishwarya rai wins award but randeep felt guilt

महत्त्वाच्या बातम्या-

मलायका अरोरा होणार आई?; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

काँग्रेसचा संजय निरूपम यांना मोठा झटका!

श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरे गटाचा उमेदवार अखेर ठरला!

अनिल परब यांच्या साई रिसॉर्टवर हातोडा, किरीट सोमय्या म्हणाले…

ऐन सणासुदीला सर्वसामान्यांना मोठा झटका!

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now