Aishwarya Rai आणि अभिषेक बच्चन यांच्यात घटस्फोट होणार नाही?, मोठी माहिती आली समोर

On: January 7, 2024 7:38 PM
Abhishek Bachchan
---Advertisement---

Aishwarya Rai | अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek bachchan) यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत आहेत. ऐश्वर्या अभिषेकपासून दूर राहतेय असेही म्हटले जात आहे. तर, काही दिवसांपूर्वीच सासू जया बच्चन आणि नणंद श्वेता बच्चन या दोघींनी ऐश्वर्यावर आरोप केले होते. या सर्व घडामोडीनंतर आता मोठी माहिती समोर आली आहे.

ऐश्वर्या (Aishwarya Rai)आणि अभिषेक बच्चन यांच्यात घटस्फोट होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. कारण, ऐश्वर्या आपल्या सहकुटुंबासोबत एकत्र दिसून आली. अभिषेकच्या जयपुर पिंक पँथर्स या कबड्डी संघाला ऐश्वर्या पूर्ण कुटुंबासोबत चीअर करताना दिसून आली.

ऐश्वर्या-अभिषेक दिसले एकत्र-

शनिवारी झालेल्या (6 जानेवारी) मुंबईतील सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियममध्ये ऐश्वर्या (Aishwarya Rai) पती अभिषेक, अमिताभ बच्चन आणि मुलगी आराध्यासोबत एकत्र दिसून आली. येथे ऐश्वर्या अभिषेकसह जयपूर पिंक पँथर्सची जर्सी घालून स्टँडमध्ये बसली होती.

स्टार स्पोर्ट्सने या संबंधी एक व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे. जो सामन्यादरम्यान घेण्यात आला होता. पती अभिषेकच्या टीमच्या विजयावर ऐश्वर्या आनंद व्यक्त करताना दिसली. या सामन्यात मुंबा यू संघाने 31 गुण मिळवले. तर जयपूर पिंक पँथर्सने 41 गुण मिळवून विजय प्राप्त केले.

Aishwarya Rai चा घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम?

ऐश्वर्याचा नवरा अभिषेक बच्चन हा बंटी वालियासह जयपूर पिंक पँथर्सचा सह-मालक आहे. या संघाने 2014 मध्ये प्रो कबड्डी लीगमध्ये खेळण्यास सुरुवात केली. शनिवारी झालेल्या सामन्यात ऐश्वर्या अभिषेकसह दिसून आल्याने अखेर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असल्याचे म्हटले जात आहे.

एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्याला (Aishwarya Rai) एक प्रश्न विचारला गेला होता ज्यात तीने दिलेल्या उत्तरामुळे तीची सगळीकडून तारीफ झाली. मुलाखती दरम्यान, ऐश्वर्याला जाॅईंट फॅमिली सोबत कशी राहतेस?, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देत ऐश्वर्या म्हणाली की, “भारतात सगळ्या गोष्टी खूप नाॅर्मल आहेत. जाॅईंट फॅमिली सोबत राहणं फार वाईट नाहीये. आणि भारतात या सगळ्या गोष्टी फार काॅमन आहेत. मला जाॅईंट फॅमिली सोबत राहणं आवडतं कारण त्यांच्यासोबत कधी डिनर प्लॅन करण्यासाठी अपॉईंटमेंटची गरज पडत नसते.” तीच्या या उत्तरामुळे सर्वांनी तिचं कौतूक केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

Invest Money l बचत खात्यात पैसे ठेवणे योग्य की अयोग्य? गुंतवणुकीचा योग्य मार्ग काय?

Voter ID Card l अगदी काही मिनिटांत घरबसल्या मतदान कार्ड काढता येणार; असा करा अर्ज

Babies Teething l दात येताना बाळाला त्रास होतोय? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

Captain Miller Trailer l साऊथ सुपरस्टार धनुषचा ‘कॅप्टन मिलर’ चित्रपट धुमाकूळ घालण्यास सज्ज

Sharad Mohol | अटक केलेला वकील कोर्टातच ढसाढसा रडू लागला, सांगितलं आरोपींना काय दिला सल्ला

News Title- Aishwarya Rai will not divorce Abhishek Bachchan

Join WhatsApp Group

Join Now