जया बच्चनचे ‘ते’ शब्द ऐकताच ऐश्वर्या रायच्या डोळ्यात खळकन् आलं पाणी

On: January 23, 2025 3:30 PM
aishwarya rai
---Advertisement---

Aishwaya Rai | बॉलिवूडमधील बच्चन परिवार नेहमीच चर्चेत असतो. अमिताभ बच्चन यांच्या अभिनयामुळे तर जया बच्चन यांच्या सौंदर्य आणि सोज्वळ स्वभावामुळे हा परिवार नेहमीच प्रकाशझोतात राहिला आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या राय (Aishwaya Rai) यांचे लग्न झाल्यापासून ऐश्वर्याही या परिवाराचा अविभाज्य भाग झाली आहे.

तिचे सौंदर्य, अभिनय आणि प्रतिष्ठा यामुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी जया बच्चन यांनी आपल्या सुनेविषयी व्यक्त केलेल्या भावना पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

जया बच्चन यांनी काही वर्षांपूर्वी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात ऐश्वर्या रायचे (Aishwaya Rai)  सर्वांसमोर कौतुक केले होते. त्या वेळी त्यांनी म्हटले होते, “मी एका सुंदर मुलीची सासू बनले आहे, जिच्याकडे मूल्ये आणि प्रतिष्ठा आहे. तिचे हसणे मला खूप आवडते. बच्चन परिवारात मी तुझे स्वागत करते आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.” जया यांच्या या शब्दांनी ऐश्वर्या भावुक झाली होती. तिच्या डोळ्यांतून अश्रू (Tears) ओघळू लागले होते आणि हा प्रसंग त्या वेळी प्रत्येकाला भावला होता.

जया आणि ऐश्वर्याच्या नात्याबद्दलच्या चर्चा-

बऱ्याच काळापासून बच्चन कुटुंबात ऐश्वर्या आणि जया यांच्या नात्याबद्दल तर्कवितर्क लावले जात होते, मात्र या जुन्या व्हिडिओमुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. ऐश्वर्या राय आता क्वचितच जया बच्चन यांच्यासोबत दिसते, पण त्या काळात जया यांनी केलेले कौतुक त्यांच्या नात्याचे महत्त्व अधोरेखित करते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, चाहत्यांनी (Fans) या क्षणाचे कौतुक केले आहे.

इतकंच काय तर, ऐश्वर्या बच्चन कुटुंबापासून वेगळं होणार, ती अभिषेकला घटस्फोट देणार इथपर्यंत या चर्चा झाल्या. दुसरीकडे ऐश्वर्या अनेक कार्यक्रमांमध्ये आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत दिसून आली. त्यामुळे या सर्व चर्चा तेव्हा फोल ठरल्या.

News Title : aishwarya rai cries Jaya Bachchan’s praise her

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now