ऐश्वर्या सोडणार ‘बच्चन’ कुटुंबियांचं घर?; अखेर कारण आलं समोर

On: March 29, 2024 11:07 AM
Aishwarya Rai
---Advertisement---

Aishwarya Rai | बॉलीवूड अभिनेत्री तथा बीग-बी यांची सून अभिनेत्री ऐश्वर्या रायने सर्वांत मोठा निर्णय घेतला आहे. ऐश्वर्याने बच्चन कुटुंबियांचं घर सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्याच्या चर्चा होत आहेत. ऐश्वर्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ती अभिषेकला घटस्फोट देणार, अशाही चर्चा खूप दिवस रंगल्या. अशात अनेकदा ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र दिसले, ज्यामुळे रंगणाऱ्या चर्चांवर पूर्णविराम लागला होता. आता पुन्हा एकदा बच्चन कुटुंबियाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे.

ऐश्वर्या आराध्यासोबत परदेशात शिफ्ट होणार?

ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि अभिषेक यांची लाडकी लेक आराध्यामुळे ते आता चर्चेत आले आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्या लेक आराध्या हिच्यासोबत परदेशात शिफ्ट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. काही रिपोर्टनुसार अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी लेक आराध्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

आराध्या बच्चन आपल्या पुढील शिक्षणासाठी परदेशात जाणार आहे. पुढच्या शिक्षणासाठी आराध्या लंडन किंवा न्यूयॉर्क याठिकाणी जाऊ शकते, अशी माहिती आहे. सध्या आराध्या धीरुबाई अंबानी शाळेत शिक्षण घेत आहे. 10 वी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आराध्या परदेशात जाईल, असं सांगण्यात येत आहे.

ऐश्वर्या सोडणार ‘बच्चन’ कुटुंबियांचं घर?

ऐश्वर्या आणि अभिषेक लेकीच्या शिक्षणासाठी प्रदेशात जाणार असल्याची माहिती आहे. ऐश्वर्याने नुकतीच आपल्या मुलीसोबत आणि नवऱ्यासोबत होळी साजरी केली. तिघांनी आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत होळीचा आनंद घेतला. त्यांचे फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले.

दरम्यान, ऐश्वर्याची (Aishwarya Rai) लाडकी लेक आराध्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्टारकिड्सच्या यादीत आराध्या अव्वल स्थानी आहे. सोशल मिडियावर देखील आराध्या हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. नुकताच जामनगर येथे अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्रि-वेडिंग सेलिब्रेशन सोहळ्यात सर्वांच्या नजरा आराध्या हिच्यावर येऊन थांबल्या होत्या.

News Title : Aishwarya Rai Could Be Shift Abroad For Aradhaya Further Study

महत्त्वाच्या बातम्या-

हार्दिक पांड्यामुळे मुंबई इंडियन्सवर लज्जास्पद विक्रमाची नोंद

हार्दिक पांड्याला संघातून काढणार?, ‘या’ तडाखेबाज खेळाडूमुळे हार्दिकचं करिअर सापडलंय संकटात

चित्रपट चालत नसल्याने राजकारणात एंट्री?; कंगनानं अखेर सांगितलं कारण

‘राम सातपुते खोट्या गरिबीचा…’; प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप

Hardik Pandya सारखा का धरतो स्वतःच्या गोलंदाजीचा आग्रह?, T20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची माहिती समोर

Join WhatsApp Group

Join Now