ऐश्वर्याच्या ‘या’ सवयीचा श्वेता बच्चनला येतो राग; सर्वांसमोर केला खुलासा

On: June 3, 2024 5:36 PM
Aishwarya Rai Bachchan
---Advertisement---

Aishwarya Rai Bachchan | बच्चन कुटुंब हे बॉलिवूडमधील इतर कुटुंबांपैकी एक आहे. बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांची कन्या श्वेता बच्चन आणि सूनबाई तसेच बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) हि आपली भावजय श्वेता बच्चनमुळे बच्चन कुटुंबापासून लांब राहत आहे. ऐश्वर्या ही तिच्या आईकडे माहेरी राहते अशी माहिती समोर आली आहे. अशातच ता श्वेता बच्चन-नंदा हिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत श्वेता बच्चन ही वहिनी ऐश्वर्याच्या कोणत्या सवयी आवडत नाही, याबाबत सांगताना दिसत आहे. या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्चा वर्षाव होताना दिसत आहे. (Aishwarya Rai Bachchan)

सेलिब्रिटींच्या खासगी जीवनाबाबत वैयक्तिक गोष्टी जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. दरम्यान श्वेता ही कॉफी विथ करणमध्ये बोलत असताना दिसतेय. करणने श्वेताला ऐश्वर्याबद्दल विचारले. यावेळी करणने विचारले की, ऐश्वर्याबद्दल तुझे मत काय? कोणती गोष्ट आवडते आणि कोणत्या गोष्टींचा तिटकारा वाटतो? त्यावर श्वेता बच्चने दिलखुलासपणे उत्तर दिलं आहे.

ऐश्वर्याच्या कोणत्या गोष्टीची चिड येते?

ऐश्वर्या ही सेल्फ मेड, स्टाँग महिला आहे. ती एक चांगली आई असल्याचं श्वेताने सांगितलं आहे. ऐश्वर्याच्या या गोष्टी आवडत असल्याचं श्वेताने सांगितलं आहे. त्यानंतर ऐश्वर्याच्या कोणत्या गोष्टीची चिड येते असं विचारण्यात आलं. त्यावर श्वेताने उत्तर दिलं. ऐश्वर्या ही मिस्डकॉल तसेच मेसेजला कधीही उत्तर देत नाही, याची श्वेता बच्चनला चिड येते.

नणंद आणि भावजय यांच्यात छत्तीसचा आकडा आहे का?

ऐश्वर्या आणि श्वेता बच्चन या अनेक कार्यक्रमांमध्ये दिसल्या आहेत. मात्र दोघीही एकमेकांपासून चार हात लांबच पाहायला मिळतात. दोघीही फार कमी वेळा एकत्र दिसतात. यामुळे आता नणंद आणि भावजय यांच्यात छत्तीसचा आकडा आहे का? असा सवाल उपस्थित होतो. (Aishwarya Rai Bachchan)

दरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनचं 2007 मध्ये विवाह झाला आहे. या दोघांनी ‘ढाई अक्षर प्रेम के’, ‘रावण’, ‘गुरू’, ‘धूम-2’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकला आराध्या नावाची एक मुलगी आहे. सध्या ऐश्वर्या आणि आराध्या नेहमीच एकत्र दिसतात. (Aishwarya Rai Bachchan)

News Title – Aishwarya Rai Bachchan-Shweta Bachchan Relation News Update

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच सर्वसामान्यांना मोठा झटका!

खरचं रविना टंडनने मद्यधुंद अवस्थेत वृद्धेला मारहाण केली? यासंदर्भात रवीना काय म्हणाली

उष्णतेपासून दिलासा मिळणार! हवामान विभागाकडून महत्वाची अपडेट

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

आयफोनला टक्कर देण्यासाठी रियलमीचा स्वस्तात मस्त स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत

Join WhatsApp Group

Join Now