ऐश्वर्या-अभिषेकमधील वाद संपले?, ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

On: April 21, 2024 1:34 PM
Aishwarya Rai
---Advertisement---

Aishwarya Rai | अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत आहेत. तर दुसरीकडे ऐश्वर्या कुटुंबासोबत अनेक ठिकाणी दिसून आली आहे. काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सेरेमनीमध्ये दिसून आली होती. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील असंख्य सेलिब्रिटींनी हजेरी लावली. त्यात बच्चन कुटुंब देखील संपूर्ण परिवारासह येथे उपस्थित होतं. तेव्हा बच्चन कुटुंबातील वाद संपुष्टात आल्याचं म्हटलं गेलं.

अशात चाहत्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिषेक-ऐश्वर्याच्या संसाराला 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्याने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. त्यातून आता या गोड जोडप्यातील वाद संपले असून दोघेही सुखी संसार करत असल्याचं जवळपास दिसून येतंय.

ऐश्वर्याची पोस्ट चर्चेत

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्या-अभिषेक दोघांनीही सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघांव्यतिरिक्त त्यांची लाडकी लेक आराध्या बच्चनदेखील दिसून येत आहे. फोटोत अभिषेक-ऐश्वर्यासह आराध्या बच्चनदेखील सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या फोटोंवर चाहते शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

सोशल मीडियावर फोटो शेअर करत ऐश्वर्या-अभिषेकने (Aishwarya Rai) कॅप्शनमध्ये रेड हार्ट इमोजी पोस्ट केली आहे. फोटोखाली असणारं रेड हार्ट इमोजीचं कॅप्शन बरंच काही सांगून जाणारं आहे. बॉलिवूड स्टार्सपासून चाहत्यांपर्यंत सर्वांनी या जोडप्याच्या पोस्टवर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. यासोबतच आराध्याच्या सौंदर्याचं देखील नेटकरी कौतुक करत आहेत.

ऐश्वर्या-अभिषेक यांची लव्हस्टोरी

ऐश्वर्या (Aishwarya Rai ) आणि अभिषेक यांनी एकत्र बऱ्याच चित्रपटांत काम केलं आहे. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच त्यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि ते लग्नबंधनात अडकले. न्यूयॉर्क येथील हॉटेलच्या बाल्कनीत अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केलं होतं.

अभिषेक-ऐश्वर्या यांनी 2007 मध्ये लग्न करत संसार थाटला. त्यानंतर 2011 मध्ये ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिला. आता त्यांच्या लग्नाला जवळपास 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत होती. आता ती नवीन पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

News Title :  Aishwarya Rai anniversary post in discussion

थोडक्यात बातम्या-

जितेंद्र आव्हाड यांच्यावरील ‘तो’ गुन्हा अखेर मागे, राजकीय वर्तुळात एकच चर्चा!

“महाराष्ट्राचा महानालायक कोण?, अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे पहिले येतील”

“लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस”, ‘त्या’ खोलीबद्दल ठाकरेंचा गौप्यस्फोट

या राशीच्या व्यक्तींनी दुचाकी वाहन चालवताना सावधानता बाळगावी

हवा फिरली?, ‘या’ एका गोष्टीत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना दिली पहिल्यांदाच मात

Join WhatsApp Group

Join Now